कॅनडाच्या प्रेयसीला इंम्प्रेस करण्याच्या नादात तरुण गेला तुरुंगात

कॅनडाच्या प्रेयसीला इंम्प्रेस करण्याच्या नादात तरुण गेला तुरुंगात

उत्तर प्रदेशच्या बाराबाकीमध्ये एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. दोन प्रेयसी असताना एका तरुणाने इंस्टाग्रामवर विदेशी तरुणीशी मैत्री केली. त्यानंतर त्यांचे प्रेमप्रकरण सुरु झाले.  तरुणी कॅनडाची होती. तो तिला इंप्रेस करण्यासाठी महागड्या भेटवस्तू देऊ इच्छित होता. मात्र परिस्थिती नसल्याने तो तिला महागड्या भेटवस्तू देऊ शकत नव्हता. अखेर त्याने Dhoom-3 सिनेमाप्रमाणे बॅंक लुटण्याचे प्लॅनिंग केले.

चोरी करण्यासाठी तरुणाने पीएनबी बँकेची निवड केली आणि ती लुटण्यासाठी तो गेला. त्याने बँकेचे टाळे तोडण्याचा बराच प्रयत्न केला मात्र अयशस्वी ठरला.  बॅंक लुटण्याचा प्रयत्न झालाय हे समजताच बँकेने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता त्या तरुणाचे कृत्य दिसले. पोलिसांनी त्याचा शोध घेत अवघ्या तीन तासात आरोपी तरुणाला अटक केली आहे.

शाहिद खान उर्फ अब्दुल समद असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी बॅंक लुटण्याचा प्लॅन केला होता. पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात उभे केले असता तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ
मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न...
पूजा खेडकरला अटक होणार, दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
परप्रांतीय रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करा! शिवसेनेची विलेपार्ले पोलिसांकडे मागणी 
वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात वेतनवाढ करार; भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या पाठपुराव्याला यश 
‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरातीविरुद्ध याचिका
सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ
दहशतवाद्यांच्या साथीदाराला मुंबईतून ठोकल्या बेड्या