समाज विकास क्रांती पार्टीचा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा!

समाज विकास क्रांती पार्टीचा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा!

महाविकास आघाडीला समाजातील सर्वच घटकांचा विधानसभा निवडणुकीत जोरदार पाठिंबा मिळत आहे. आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचारात गुंतले असून राज्यात ठिकठिकाणी महाविकास आघाडीतील पक्षांना जनतेचे समर्थन मिळत आहे. समाज विकास क्रांती पार्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला विधानसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत  महाविकास आघाडीला प्रचंड बहुमत मिळेल आणि महायुती आपल्या कारभारामुळे सत्तेतून बाहेर पडेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. महाविकास आघाडी निवडणुकीत जे मुद्दे घेऊन लढत आहे आणि महाराष्ट्राचे हित लक्षात घेता सत्ताधारी महायुतीला सत्तेतून खाली खेचण्यासाठी  समाज विकास क्रांती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक सिंह यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि तत्व तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन शिवसेनेला आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान

फोडा आणि राज्य करा ही भाजपची निती आहे. त्यामुळे देशाच्या विघटन करणाऱ्या शक्तींना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत आपली पार्टी पाठिंबा देत आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना समाज विकास क्रांती पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मतदान करावे, असे आवाहन करण्यात आल्याचे अशोक सिंह यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ
मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न...
पूजा खेडकरला अटक होणार, दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
परप्रांतीय रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करा! शिवसेनेची विलेपार्ले पोलिसांकडे मागणी 
वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात वेतनवाढ करार; भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या पाठपुराव्याला यश 
‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरातीविरुद्ध याचिका
सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ
दहशतवाद्यांच्या साथीदाराला मुंबईतून ठोकल्या बेड्या