आर आर आबा पाटील यांनी केसाने गळा कापला, अजित पवार यांचे वादग्रस्त विधान

आर आर आबा पाटील यांनी केसाने गळा कापला, अजित पवार यांचे वादग्रस्त विधान

माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला, तेव्हा आर आर आबा पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले होते आणि माझा केसाने गळा कापला असे वादग्रस्त विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच आबा पाटील गुटखा आणि तंबाखु खायचे त्यांना मी रोखायचो असेही अजित पवार म्हणाले.

सांगलीत एका सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की त्यावेळी माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला. विरोधकांनी आकडा एवढा मोठा सांगितला की लोकांनाही विश्वास वाटायचा की खरंच एवढा मोठा घोटाळा झाला असावा. या प्रकरणाची एक फाईल झाली. ही फाईल गृहखात्याकडे गेली आणि आबा पाटील यांनी शेरा लिहिला की या प्रकरणाची ओपन इन्क्वायरी करावी आणि सही केली. हा प्रकार म्हणजे केसाने गळा कापण्यासारखा आहे. 2014 च्या निवडणुकीपुर्वी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही पाठिंबा काढला आणि राष्ट्रपती राजवट लागली. तेव्हा राज्यपालांनी या फाईलवर सही करण्यास नकार दिला आणि पुढील जे सरकार येईल ते कारवाई करतील असा पवित्रा घेतला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले त्यांनी मला घरी बोलावलं आणि ही फाईल दाखवली. त्यावर खरंच आबा पाटील यांनी सही केली होती असे अजित पवार म्हणाले.

तंबाखु खाणारे आबा पाटील

आर आर आबा पाटील यांना तंबाखु आणि गुटखा खाण्याची सवय होती असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच आपण त्यांना सतत तंबाखु खाऊ नका असा सल्ला द्यायचो पण त्यांनी ऐकले नाही असेही अजित पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘वोट जिहाद’ प्रकरणात मोठी अपडेट; किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर पोलिसांची धडक कारवाई ‘वोट जिहाद’ प्रकरणात मोठी अपडेट; किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर पोलिसांची धडक कारवाई
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनेक मुद्दे आणि गुद्दे समोर येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या निवडणुकीत वोट जिहाद होत...
पाकिस्तानबद्दलच्या वक्तव्यानंतर सिद्धूंना सोडावा लागला कपिलचा शो; आता म्हणाले “सरदारच पाहिजे..”
“तुम्ही ज्या सूरजवर प्रेम केलंत, तो बाहेर आल्यावर तसा नाही..”; वादावर काय म्हणाली अंकिता?
जुही चावलाची वादग्रस्त पोस्ट, ‘एखाद्या गटारात राहतोय असं…’, देवेंद्र फडणवीस म्हणाले…
अमित ठाकरे यांना का मतदान करावं? मराठी अभिनेत्याने दिली 10 कारणं
कपूर, खान नाही तर बॉलिवूडमधील ‘हे’ कुटुंब सर्वांत श्रीमंत; तब्बल 10 हजार कोटींची संपत्ती, एकेकाळी विकायचे फळं
भाजपची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ घोषणा पोकळ; काँग्रेसच्या आराधना मिश्रा यांची टीका