जमीनीच्या वादातून अल्पवयीन मुलाचं मुंडकं छाटलं, धडावेगळं झालेलं शीर कुशीत घेऊन आईने फोडला हंबरडा
जमीनीच्या वादातून टोकाचे संघर्ष झाल्याच्या अनेक घटना देशाच्या कानाकोपऱ्यात घडत असतात. मात्र, उत्तर प्रदेशात जमीनीच्या वादातून काळजाचा थरकाप उडवणारा रक्तपात घडला. मुलाचं छाटलेले मुंडकं कुशीत घेऊन आईने हंबरडा फोडल्याची ह्रदयद्रावक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.
उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना बुधवारी (30 ऑक्टोबर) घडली. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौराबादशाहपुर मधील कबीरुद्दीन या गावात दोन गटांमध्ये जमीनीवरून वाद सुरू होता. बुधवारी या वादाचे रुपांतर भयंकर अशा हाणामारीत झाले. यावेळी झालेल्या झटापटीत रामजीत यादव यांचा 17 वर्षीय मुलगा अनुराग याचा विरोधी गटातील लोकांनी पाठलाग केला. यातील एकाने अनुरागवर तलवारीने जबर वार केला आणि काही क्षणात अनुरागचे शीर धडापासून वेगळे झाले. सदर घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे धडावेगळे झालेले शीर कुशीत घेऊन आई तासंतास मोठमोठ्याने रडत होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List