अफगानिस्तानमध्ये प्रवासी वाहन नदीत कोसळले, 8 प्रवाशांचा बुडून मृत्यू
अफगानिस्तानमध्ये प्रवासी वाहन नदीत कोसळल्याने 8 प्रवाशांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. नदीवरील पुलावरून वाहन जात असतानाच हा अपघात घडल्याचे प्रांतिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास प्रवासी वाहन नदीवरील लाकडी पुलावरून चालले होते. मात्र पूल जीर्णावस्थेत असल्याने वाहनाच्या वजनामुळे तो तुटला आणि वाहन नदीत कोसळले. यात वाहनातील आठ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला.
सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पुलाची जीर्ण स्थिती, ओव्हरलोडिंग आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे यामुळेच ही अपघाताची घटना घडली. याआधी 5 ऑक्टोबर 2024 रोजी अफगाणिस्तानच्या नूरिस्तान प्रांतात प्रवासी कार दरीत कोसळल्याने महिला आणि मुलांसह किमान सात जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List