मुंबई पब्लिक स्कूल मॉडेल राज्यभर राबवा, सपाचे आमदार रईस शेख यांनी घेतली आदित्य ठाकरे यांची भेट
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबईत राबवलेली मुंबई पब्लिक स्कूल ही संकल्पना आदर्शवत ठरत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर मुंबई पब्लिक स्कूलचे मॉडेल राज्यभरात राबवण्यात यावे अशी विनंती समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आज आदित्य ठाकरे यांना केली.
रईस शेख यांनी मातोश्री निवासस्थानी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा झाली. मुंबई पब्लिक स्कूलचेही शेख यांनी यावेळी कौतुक केले. या मॉडेलमुळे मुंबई महानगरपालिकेच्या इंग्रजी शाळांमध्ये 27 टक्के तर पूर्व प्राथमिक वर्गात 125 टक्के विद्यार्थी प्रवेश वाढले होते, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमाचा मुंबईबाहेर राज्यभरात विस्तार करा आणि त्याची सुरुवात भिवंडीतून करा अशी मागणी यावेळी शेख यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List