फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांचा आरोप
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं. आम्हला बदनाम केलं, असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर चव्हाण यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकी दरम्यान चव्हाण यांचे पुत्र तुळजाभवानी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी महाराष्ट्र कॉँग्रेसच्या सचिव पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस नेते मधुकर चव्हाण यांनी फडणवीसांवर घर पह्डल्याचा आरोप केला आहे.
आमच्या धाकटय़ा मुलाच्या मित्रांनी फडणवीस यांना बोलावले होते. ते सोलापूरला आले त्या वेळी मी खंडोबाच्या दर्शनाला गेलो होतो. समोरून ताफा आला. मी विचारलं, कोण आले? तेव्हा कळलं की, देवेंद्र फडणवीस आले आहेत. मीपण तिथे गेलो. मी त्यांना म्हटले, साहेब तुम्ही चूक केली आहे. आमचं घर पह्डून तुम्ही आम्हाला अस्वस्थ केले आहे. आम्हाला बदनाम केले. त्याचं दुःख आम्हाला आहे. तुम्हाला ते कधी तरी फेडावं लागेल, अशी खंत मधुकरराव चव्हाण यांनी संवाद मेळाव्यात व्यक्त केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List