Video कवितेतून फडणवीसांकडून शिवरायांचा अपमान; राष्ट्रवादीने ‘ठाकरे’ शैलीतलं उत्तर ऐकवलं

Video कवितेतून फडणवीसांकडून शिवरायांचा अपमान; राष्ट्रवादीने ‘ठाकरे’ शैलीतलं उत्तर ऐकवलं

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटलीच नव्हती असा दावा करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कविता सादर केली. मात्र त्या कवितेतील संदर्भ वादग्रस्त असल्याने शिवप्रेमींनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी फडणवीसांचा तो व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ट्विट करत त्यांना फटकराले.  या कवितेतील संदर्भाला उत्तर म्हणून ठाकरे शैलीतलं हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला.

टीव्ही 9 च्या कार्यक्रमात फडणवीसांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या बाबतीत एक दावा केला. ”कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा महाराजांसमोर आणल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की अशीच माझी आई असती तर मी देखील तेवढा सुंदर असतो”, असे फडणवीस म्हणाले आहेत. फडणवीसांच्या त्या व्हिडीओसोबत राष्ट्रवादीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत अशा प्रकारची कविता लिहणाऱ्या कविला शिवसेनाप्रमुख फटकारताना दिसत आहेत.

राष्ट्रवादीने या व्हिडीओवरून एक पोस्ट शेअर करत भाजप व फडणवीसांना फटकारले आहे. ”ज्या शिवछत्रपतींना आपल्या आईंबद्दल नितांत आदर होता ते आपले महाराज राजमाता जिजाऊसाहेबांची तुलना कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेशी का करतील? अहो फडणवीसजी, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल फक्त खोटा इतिहास पेरणाऱ्या परंपरेचे वारसा चालवता पण आम्ही मराठी जनतेसमोर तुम्हा लोकांचा कपटी शिवद्रोही चेहरा समोर आणू” असा इशारा राष्ट्रवादीने या पोस्टमधून दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या आजच्या आंदोलनाबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने सर्वांना असेच शिकवले की, शिवरायांनी सुरत लुटली होती, पण तसे काहीच झाले नव्हते. शिवरायांनी सुरत लुटलीच नव्हती. त्यांनी केवळ स्वराज्याचा खजिना तेथील काही लोकांकडून परत आणला, असे धक्कादायक विधान केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘…तेव्हा सर्वात आधी गाडी घेऊन जाणारा मी होतो, मी कुटुंबात कधी…’, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं ‘…तेव्हा सर्वात आधी गाडी घेऊन जाणारा मी होतो, मी कुटुंबात कधी…’, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाऊ उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. राज ठाकरे यांची दादर माहीम मतदारसंघात मनसे...
राष्ट्रसंतांच्या भूमीत योगींची भाषा विष पेरणारी; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश, मुख्य शूटर शिवकुमार गौतमला अटक
‘तुमची त्यांना भीतीच उरली नाही’, बेधडक राज ठाकरेंचं अत्यंत कळकळीचं भाषण
मोठी बातमी! धारावीत काँग्रेस-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, अनेक जण जखमी झाल्याची माहिती
चालल्यानंतरही वजन कमी होत नसेल तर ‘या’ चुका टाळा
मशाल अशी पेटून धगधगू द्या की, भ्रष्टाचाऱ्यांच्या बुडाला आग लागली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची गर्जना