मला ती व्यक्ती संशयास्पद वाटली, पहलगाम हल्ल्यात बचावलेल्या पर्यटकाने सांगितली आपबीती
पहलगाम हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात एक पर्यटक झिपलाईनमधून जाताना दिसतोय. आणि खाली दहशतवादी पर्यटकांना गोळी घालताना दिसत आहेत. ऋषी भट यांनी हा व्हिडीओ शूट केला होता. पण हल्ल्याच्यावेळी झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर म्हणत होता असे व्हिडीओत दिसतंय. भट यांनी घरी आल्यावर हा व्हिडीओ पाहिला आणि त्यांना यात संशयास्पद आढळलं.
New 18 Gujarati या वाहिनीशी बोलताना ऋषी भट म्हणाले की, झिपलाईनमध्ये माझ्या आधी 10 माणसं गेली. तेव्हा त्या व्यक्तीने अल्ला हू अकबर म्हटलेलं नाही. पण जेव्हा मी झिपलाईनमध्ये जात होतो तेव्हा त्याने तीन वेळा अल्ला हू अकबर म्हटलं. तसेच त्या व्यक्तीच्या मागे एक व्यक्ती उर्दू भाषेतलं पुस्तक वाचत होता. 23 तारखेला आम्ही अहमदाबादला घरी पोहोचल्यानंतर व्हिडीओ पाहिले तेव्हा लक्षात आलं. तो माणूस जेव्हा फायरिंग करत होता तेव्हाच तो अल्लाहू अकबर म्हणत होता. ही बाब मला संशयास्पद वाटली म्हणूनच तो व्हिडीओ मी कुठल्याही सोशल मीडियावर अपलोड केला नव्हता. माझ्या ओळखीतले एक व्यक्ती सैन्यात आहेत त्यांना विचारल्यानंतरच हा व्हिडीओ मी शेअर केल्याचे भट यांनी सांगितले.
अल्ला हू अकबर म्हणणारी व्यक्ती ताब्यात
अल्ला हू अकबर म्हणणाऱ्या तरुणाचे नाव मुझ्झमील असल्याचे समोर आले आहे. मुझ्झमीलचा भाऊ मुख्तार हा झिपलाईनच्या व्यवसाय करतो. मुख्तारने सांगितले की जेव्हा गोळीबार झाला तेव्हा मुझ्झमीलने घाबरून तीन वेळा अल्ला हू अकबर म्हटलं. तसेच त्यावेळी मुझ्झमील घाबरून घरी आला, राष्ट्रीय तपाससंस्थेने त्याला ताब्यात घेतले होते आणि चौकशी करून सोडून दिले होते. पण आता व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला परत ताब्यात घेतल्याचे मुख्तार यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List