हिंदुस्थानी व्हॉलीबॉल संघाचा पाकिस्तानात जाण्यास नकार

हिंदुस्थानी व्हॉलीबॉल संघाचा पाकिस्तानात जाण्यास नकार

पहलगाममधील भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानला जिथे जिथे कोंडीत पकडता येईल तिथे पकडण्याचा प्रयत्न हिंदुस्थान करत आहे. पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र आता हिदुस्थानी संघाने या दौऱयावर जाण्यास नकार दिला आहे. याआधी फक्त हिंदुस्थानचा क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱयावर जात नव्हता. आता व्हॉलीबॉल संघाने जाण्यास नकार दिल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय.

ही स्पर्धा 28 मेपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानातील 22 खेळाडू व आठ कोचिंग स्टाफमधील व्यक्ती जाणार होते. मात्र या स्पर्धेला आता एक महिना बाकी असताना आपण या स्पर्धेत खेळणार नसल्याचे हिंदुस्थानी संघाने स्पष्ट केले आहे. हिंदुस्थान जर या स्पर्धेसाठी जाणार नसेल तर बाकीचे देशही या स्पर्धेसाठी जाणार नसल्याचे समोर येत आहे. आशिया खंडात हिंदुस्थानची काय ताकद आहे, हे पाकिस्तानला दाखवून देण्यात सध्या कुठलीस कसर सोडली जात नाहीये. त्यामुळे आता पाकिस्तानचे धाबे चांगलेच दणाणले असेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत पुन्हा सेलिब्रिटीचा गेम? बिश्नोई गँगशी काय कनेक्शन, पोलिसांचा तो मोठा खुलासा काय मुंबईत पुन्हा सेलिब्रिटीचा गेम? बिश्नोई गँगशी काय कनेक्शन, पोलिसांचा तो मोठा खुलासा काय
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यासह इतर काही जण लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर...
लाज वाटत नाही का?; करीना कपूरचा पाकिस्तानी डिझायनरसोबतचा फोटो पाहून नेटकरी संतापले
gond katira: गोंड कतीरा भिजवून खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
bay leaf benefits: स्वयंपाकघरातील ‘या’ मसाल्यामुळे तुमचे सर्व आजार होतील छूमंतर…
उन्हाळ्यात तुमचर मूल आजारी पडणार नाही, ‘या’ 5 गोष्टींकडे द्या विशेष लक्ष
अहमदाबादमध्ये बेकायदेशीरपणे राहत असलेल्या बांगलादेशींच्या घरांवर बुलडोझर, पालिकेची सर्वात मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यातील पीडित सहा कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा