सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलंय, तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबतच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि सीडीएस अनिल चौहान यांच्याव्यतिरिक्त तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख देखील उपस्थित होते. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान मोदींनी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. ते म्हणाले की, दहशतवादाला योग्य उत्तर देणे हा आपला दृढ राष्ट्रीय संकल्प आहे. त्यांनी हिंदुस्थानी सशस्त्र दलांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, सशस्त्र दलांना आपल्या कारवाईची पद्धत, टार्गेट आणि वेळ याबाबत ऑपरेशनल निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List