मेडिकल व्हिसाची वैधता संपली, पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परतावं लागणार
पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानवर कारवाया सुरू केल्या आहेत. आता हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानी नागरिकांचा मेडिकल व्हिसा रद्द केला होता. आता या पाकिस्तानी नागरिकांना हिंदुस्थान सोडावा लागणार आहे.
चांगल्या आरोग्य सुविधा आणि उपचारासाठी पाकिस्तानी नागरिक हिंदुस्थानात येतात. त्यांना मेडिकल व्हिसाच्या माध्यमातून हिंदुस्थानात प्रवेश मिळतो. पण आता पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान सरकारने हा मेडिकल व्हिसाही रद्द केला आहे. आज या नागरिकांना हिंदुस्थान सोडण्याचा शेवटचा दिवस आहे.
हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात मेडिकल व्हिसावर येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या रोडावली आहे.
आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले की पहलगाम हल्ल्यानंत दोन्ही देशांनी जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे हिंदुस्थानातील मेडिकल टुरिज्म बंद होईल अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान सरकारने घोषणा केली की पाकिस्तानी नागरिकांचा मेडिकल व्हिसा 29 एप्रिलपर्यंत वैध राहील अशी घोषणा केली. त्यामुळे उपचारांसाठी आलेल्या नागरिकांना त्यांच्या मायदेशी परतावं लागणार आहे.
2016 साली हिंदुस्थानात 1600 पाकिस्तानी मेडिकल व्हिसावर आले होते. त्यानंतर या संख्येत घट झाली, 2024 साली 200 पाकिस्तानी नागरिक मेडिकल व्हिसावर हिंदुस्थानात आले होते. आता आज त्यांना मायदेशी परतावं लागणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List