पीएफ बॅलेन्स आता तत्काळ होणार ट्रान्सफर, ईपीएफओकडून अपडेटेड फॉर्म 13 रोलआऊट
कर्मचारी भविष्य निधी संघटन (ईपीएफओ) ने फॉर्म 13 ला अपडेट केले आहे. या नव्या अपडेटमुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. कर्मचाऱ्याने नोकरी बदलल्यानंतर पीएफ अकाऊंटला ट्रान्सफर करण्यासाठी आता जास्त वाट पाहावी लागणार नाही. याआधी नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्याला दोन्ही ऑफिस म्हणजे आधीचे आणि नवीन ऑफिसकडून पीएफ ट्रान्सफरसाठी मंजुरी घ्यावी लागत होती. यासाठी बरेच दिवस जात असायचे, परंतु आता पीएफ बॅलन्स तत्काळ दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर केला जाईल.
फॉर्म 13 चे अपडेटेड व्हर्जन, पीएफ व्याज (टेक्सेबल) आणि नॉन टेक्सेबल कंपोनेंटलासुद्धा वेगवेगळे दाखवले जाईल. या नव्या अपडेटमुळे 1.25 कोटींहून अधिक ईपीएफओ सदस्यांना लाभ मिळू शकतो. ईपीएफओ अकाऊंटला ट्रान्सफर करताना वेग आणणे आणि प्रक्रियेला सोपे बनवण्यासाठी फॉर्म 13 चे अपडेटेड व्हर्जनला रोलआऊट करण्यात आले आहे. नव्या सिस्टमनुसार, जुन्या कंपनीकडून मंजुरी मिळताच पीएफ बॅलेन्स आपोआप नव्या कंपनीत ट्रान्सफर होईल. या अपडेटेड फिचरमुळे टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्सेस (टीडीएस) चे योग्य कॅल्क्युलेशनमध्येही मदत होईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List