राणे थोरल्या मुलाच्या पुर्नवसनासाठी शिंदेंना किती वेळा भेटले? परशुराम उपरकर यांचा टोला

राणे थोरल्या मुलाच्या पुर्नवसनासाठी शिंदेंना किती वेळा भेटले? परशुराम उपरकर यांचा टोला

शिंदे गटात कोणालाही प्रवेश द्यायचा असेल तर, माझी परवानगी लागेल, असे वक्त‌व्य नारायण राणे यांनी केले आहे. त्यामुळे नारायण राणे शिंदे गटाचे संपर्कप्रमुख आहेत की, भाजपचे खासदार आहेत? असा गैरसमज निर्माण होत आहे. वैभव नाईक असतील किंवा आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री असताना भेटलो, ती भेट विधायक कामांसाठी होती. परंतु नारायण राणे भाजपचे खासदार असून एकनाथ शिंदेंना 100 वेळा भेटत होते, ते कशासाठी? शिंदे गटात प्रवेश देण्यासाठी राणे संपर्क प्रमुख आहेत का? थोरल्या मुलाच्या पुर्नवसनासाठी शिंदेंना ते किती वेळा भेटले? हे जनतेसमोर राणेंनी जाहीर करावे, असे आव्हान माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिल आहे. तसेच करंजे येथे गोशाळा चालू करण्यापूर्वी राणेंनी यापूर्वी आणलेल्या दूध डेअरीकडून शेतकऱ्यांचे अडीच कोटी रुपये येणे बाकी आहेत, ते पालकमंत्री केव्हा देणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, ते म्हणाले की, 2005 च्या पोट निवडणुकीमध्ये नारायण राणेंना पाडण्यासाठी 100 लोक घेऊन त्यावेळी ठाण्यातून एकनाथ शिंदे व कार्यकर्ते जिल्ह्यात आले होते, हे राणेंनी विसरू नये. ज्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षातून हाकलपट्टी केली, त्यावेळी काँग्रेस नेत्या प्रभा राव व कॉंग्रेस नेत्यांना राणे भेटत होते, त्याच बरोबर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना नारायण राणे अनेकदा भेटले. तसेच गुजरातला कोणाकोणाला भेटायला ते जात होते? राणेंनी पक्षांतर केले ते स्वत:च्या स्वार्थासाठी केला, असा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.

ज्यावेळी मनीलॉंड्रींगची केस त्यांच्यावर झाली, त्यावेळी राणेंनी भाजप प्रवेशासाठी काय काय केले? हे आम्हाला माहित आहे. स्वत:च्या दोन नंबरच्या मुलाचा भाजप प्रवेश होताना राणेंना किती वेळ बसस्थानकावर फडणवीसांनी थांबवून ठेवले होते, त्यानंतर तो प्रवेश भाजप माजी आ. प्रमोद जठार यांच्या हस्ते झाला होता, हे राणेंनी विसरू नये. शिंदे गटातील संपर्कमंत्री तथा पक्षातील 2 नंबरचे मंत्री पदावर असलेले नेते उदय सामंत यांना कोणाला पक्षात घ्यायचे? याचा अधिकार नसेल तर, सामंतांसोबत शिंदे गटात गेलेल्या कार्यकर्त्यांवर विचार करण्याची वेळ आली आहे, असे परशुराम उपकर म्हणाले आहेत.

राणेंनी काही वर्षापूर्वी जिल्ह्यात एक डेअरी आणली होती, त्या दूध डेअरीने शेतकऱ्यांकडून दूध घेवून अडीच कोटी रुपये अद्यापही शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. हे शेतकऱ्यांचे पैसे वसुल करुन देण्याची जबाबदारी पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली होती. त्यांनी गोशाळा होण्यापूर्वी या शेतकऱ्यांना पैसे देवून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उन्हाळ्यात डोक्यामध्ये सतत खाज येत असेल तर ‘या’ हिरव्या पानांचा करा वापर, लगेच आराम मिळेल उन्हाळ्यात डोक्यामध्ये सतत खाज येत असेल तर ‘या’ हिरव्या पानांचा करा वापर, लगेच आराम मिळेल
उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे आपल्याला खूप घाम येत असतो. त्यात घामामुळे डोक्यातील स्कॅल्पला खाज येण्याची समस्या अनेकदा उद्भवते. कधीकधी ही खाज...
benefits green chillies: हिरवी मिरची नाही, गुणांचा खजिना म्हणा साहेब..! फायदे जाणून अश्चर्यचकित व्हाल
शिक्षक भरतीसाठी मंत्रालयात आंदोलन, थेट आत्मदहनाचा इशारा; प्रमुख मागण्या काय?
देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती बीआर गवई यांची नियुक्ती, 14 मे रोजी घेणार शपथ
IPL 2025 – फाफ डू प्लेसिस एकटाच भिडला; फिरकीपटूंनी दिल्लीचे मनसुबे उधळले, कोलकाताचा 14 धावांनी विजय
बोगस कर्जमाफी प्रकरण : मंत्री राधाकृष्ण विखेंसह 54 जणांवर गुन्हा दाखल
नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा: हर्षवर्धन सपकाळ