IND vs SA Women – सामना हातातून निसटलाच होता! स्नेह राणाने पंजा फिरवला अन् टीम इंडियाने विजय साजरा केला
श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत टीम इंडियाने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिकेचाही पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकलेला सामना स्नेह राणाने आपल्या फिरकीच्या जोरावर खेचून आणला.
टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये 6 विकेट गमावत 276 धावा केल्या होत्या. प्रतीका रावलने 78 धावांची खेळी केली. परंतु इतर फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यामुळे संघाला 276 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत 140 धावांची सलामी दिली. कर्णधार लॉरा वोलवार्डने 43 धावा आणि तजमीन ब्रिट्सने 107 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 3 षटकार मारत 109 धावा केल्या. जवळपास सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकलाच होता. दक्षिण आफ्रिकेच्या हातात पाच विकेट शिल्लक होत्या आणि शेवटच्या तीन षटकांमध्ये 28 धावांची गरज होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिका जिंकणार हे जवळपास सर्वांनिच निश्चित केले होते.
IPL 2025 – दिवाळी लवकर आली! वैभवचा भीम पराक्रम पाहून वडिलांचा आनंद गगनात मावेना
कर्णधार हरमनप्रीतने 48 व्या षटकाची जबाबदारी स्नेह राणावर सोपवली. स्नेह राणाने कर्णधाराच्या निर्णयाचा मान ठेवतं आपल्या फिरकीची जादू दाखवली आणि या एकाच षटकात तीन विकेट घेतल्या. तीन विकेट पडल्यामुळे दक्षिण आफ्रिका पिछाडीवर गेली आणि दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 49.2 षटकांमध्येच 261 धावांवर बाद झाला. स्नेह राणाने 5 विकेट घेत संघाच्या विजयात मौल्यवान कामगिरी केली आणि टीम इंडियाचा 15 धावांनी विजय झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List