Pahalgam Terrorist Attack – पाकड्यांची तंतरली; अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीपासून घूमजाव

Pahalgam Terrorist Attack – पाकड्यांची तंतरली; अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीपासून घूमजाव

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान- पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला आहे. तसेच हिंदुस्थानने उचललेल्या कठोर पावलांमुळे पाकिस्तानची भंबेरी उडाली आणि त्यातच त्यांच्या नेत्यांनी केलेली वक्तव्ये जागतिक पातळीवर त्यांनाच अडचणीची ठरत आहेत. त्यामुळे आता त्या वक्तव्यांपासून घूमजाव करण्याची वेळ पाकड्यांवर आली आहे. हिंदुस्थानने कठोर पावले उचलल्यानंतर क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्र हिंदुस्थानसाठी तयार ठेवली आहेत, अशी दर्पोक्ती करणाऱ्या पाकड्यांची चांगलीच तंतरलेली दिसत आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानकडून संभाव्य लष्करी कारवाईच्या भीतीने पाकिस्तानी सैन्यही धास्तावले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, कधीही काहीही होऊ शकते म्हणून आम्ही आमच्या सैन्याची ताकद आणखी वाढवली आहे. तसेच त्यांनी अण्वस्त्रांबाबत विधीन केले होते. त्यांच्या या विधानावरून वाद निर्माण झाल्यावर आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असे सांगत त्यांनी सारवासारव केली आहे.

ख्वाजा आसिफ म्हणाले होते की, पाकिस्तान हाय अलर्टवर आहे. आपल्या अस्तित्वाला थेट धोका असेल तरच आपण आपली अण्वस्त्रे वापरू. युद्ध झाले तर आपण त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहोत. पुढील दोन ते तीन किंवा चार दिवसांत युद्ध भडकण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. पुढील काही दिवसांत युद्धाचा धोका आहे पण तो टाळता येऊ शकतो. हिंदुस्थानशी युद्धाची दर्पोक्ती करणारे ख्वाजा आसिफ म्हणाले होते की पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबा संपला आहे. लष्करचे पाकिस्तानशी भूतकाळात संबंध होते. आता ही दहशतवादी संघटना संपली आहे, असेही त्यांनी सांगितले.

हिंदुस्थानशी युद्धाची भाषा करणारे आणि अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिल्यानंतर विधान अंगलट येताच आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. आपल्या अस्तित्वाला थेट धोका असेल तरच आपण आपली अण्वस्त्रे वापरू, असा खुलासा करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमिर खानचा मोठा निर्णय,बॉलिवूड एकवटलं…. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमिर खानचा मोठा निर्णय,बॉलिवूड एकवटलं….
पहलगाम हल्ल्यानंतर जवळपास सगळ्याच सेलिब्रिटींनी त्यांचे दु:ख, राग , संताप व्यक्त केला आहे. सर्वांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे....
नॅनोटेक्नॉलॉजी आणि कोव्हिडवर पतंजलीचा रिसर्च; ही माहिती आली समोर
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या अ‍ॅक्शनने पाकिस्तनाला हादरा, 70 हजार कोटींचं नुकसान
कंगाल पाकिस्तानने पुन्हा हात पसरले, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मागितले 11 हजार कोटी
सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलंय, तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबतच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य
IND vs SA Women – सामना हातातून निसटलाच होता! स्नेह राणाने पंजा फिरवला अन् टीम इंडियाने विजय साजरा केला
Summer Tips- उन्हाळ्यात बडीशेप खाणे का फायदेशीर आहे? वाचा सविस्तर