सैन्यात एक लाखाहून अधिक सैनिकांची कमतरता

सैन्यात एक लाखाहून अधिक सैनिकांची कमतरता

हिंदुस्थानी सैन्य दलात एक लाखाहून अधिक सैनिकांची कमतरता असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने संसदेच्या स्थायी समितीला दिली आहे. सैन्याची एकूण संख्या 12 लाख 48 हजार आहे. मात्र अधिकाऱ्यांची कमतरता 17 टक्के आणि सैनिकांची कमतरता सुमारे 8 टक्के आहे. नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) 50 हजारांहून अधिक जवान तैनात आहेत, तर जम्मूमध्ये दहशतवादी घटनांनंतर 15 हजार अतिरिक्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानी सैन्यात सध्याच्या अधिकाऱ्यांची संख्या 42,095 (1 जुलै 2024 रोजी) आहे, तर अपेक्षित अधिकाऱ्यांची संख्या 50,538 आहे. म्हणजेच सैन्यात 16.71 टक्के अधिकाऱ्यांची कमतरता आहे. कनिष्ठ आयोग अधिकारी (जेसीओ) आणि राष्ट्रीय ऑपरेशन्स सेंटरची (एनओसी) संख्या 1,105,110 आहे. या विभागांमध्ये तब्बल 92,410 सैनिकांची कमतरता आहे, जी सुमारे 7.72 टक्के एवढी आहे.

दरवर्षी 60 हजार सैनिक निवृत्त

अग्निपथ योजनेंतर्गत सैनिकांची पदे भरली जातील, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. अधिकाऱ्यांची कमतरता तातडीने भरून काढण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. त्यातील एक म्हणजे वैद्यकीय प्रक्रिया दोन ते तीन दिवसांत पूर्ण होत आहे. दरवर्षी जवळपास 60 हजार सैनिक निवृत्त होतात. कोरोनाच्या दोन वर्षांत सुमारे 1 लाख 20 हजार सैनिक निवृत्त झाले. अग्निपथ योजनेत  पहिल्या दोन वर्षांमध्ये 40-40 हजार अग्निवीरांची भरती करण्यात आली, तर या दोन वर्षांत एक लाखाहून अधिक सैनिक निवृत्त झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News