हाडांच्या मजबूतीसाठी भिजवलेले चणे खाणे आहे खूप गरजेचे! वाचा सविस्तर

हाडांच्या मजबूतीसाठी भिजवलेले चणे खाणे आहे खूप गरजेचे! वाचा सविस्तर

रिकाम्या पोटी काही पदार्थ खाणं हे शरीरासाठी खूपच फायद्याचं असतं. म्हणूनच रिकाम्यापोटी कोमट पाणी पिणं हे शरीरासाठी खूप उपयुक्त मानलं जातं. आपल्याकडे असे अनेक पदार्थ आहेत, जे रिकाम्या पोटी खाण्यामुळे आपल्या शरीराला योग्य पोषकतत्व मिळतात. आपल्याकडे अन्न हे पूर्णब्रम्ह म्हणून ओळखले जाते. म्हणूनच आहाराच्या बाबतीत आपल्या सवयी या पूर्वापार चालत आलेल्या आहेत.

पूर्वीच्या काळी घरातील जुनी जाणती माणसं सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले हरभरे म्हणजेच चणे खाण्यास सांगायचे. ही एक साधी पण खूप फायदेशीर सवय होती. भिजवलेल्या चण्यांमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीर ऊर्जावान आणि निरोगी राहते. भिजवलेले हरभरा खाल्ल्याने शरीराला संपूर्ण पोषण मिळते म्हणूनच त्याला सुपरफूड असंही म्हटलं जातं. रिकाम्या पोटी भिजवलेले चणे खाल्यामुळे, पचनक्रिया मजबूत होते. तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्ती मिळते आणि पोटही स्वच्छ होते.

सकाळी उठल्यानंतर भिजवलेले चणे खाण्याचे फायदे

 

मुख्य म्हणजे चण्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. म्हणूनच भिजवलेले चणे मधुमेहींसाठी एक उत्तम आहार मानला जातो.

हाडांच्या मजबूतीसाठी चणे आपल्याला आहारात खूप गरजेचे आहे. चण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते. हाडांच्या मजबूतीसाठी हे घटक खूपच गरजेचे आहेत. भिजवलेले चणे नियमित खाल्ल्याने हाडांची कमजोरी दूर होते.

भिजवलेल्या चण्यात अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक घटक असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. यामुळे आजार दूर राहतात आणि शरीर अधिक निरोगी राहते.

चण्यामध्ये प्रथिने, जस्त आणि इतर खनिजे असतात, जे केस आणि त्वचेचे आरोग्य राखतात. हे त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास आणि केसांना मजबूत करण्यास मदत करते.

भिजवलेल्या चण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचा चांगला स्रोत असतो. यामुळे आपले शरीर दिवसभर उर्जावान राहते. मुख्य म्हणजे श्रम करणाऱ्यांसाठी भिजवलेलेल चणे खाणं हे खूप फायदेशीर आहे.

 

व्यायाम करणाऱ्यांसाठी भिजवलेले चणे खाणं हे खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीराला उर्जा मिळते.

(तुम्हाला कोणताही आजार किंवा इतर कोणतीही समस्या असेल तर चणे खाण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमिर खानचा मोठा निर्णय,बॉलिवूड एकवटलं…. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमिर खानचा मोठा निर्णय,बॉलिवूड एकवटलं….
पहलगाम हल्ल्यानंतर जवळपास सगळ्याच सेलिब्रिटींनी त्यांचे दु:ख, राग , संताप व्यक्त केला आहे. सर्वांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे....
नॅनोटेक्नॉलॉजी आणि कोव्हिडवर पतंजलीचा रिसर्च; ही माहिती आली समोर
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या अ‍ॅक्शनने पाकिस्तनाला हादरा, 70 हजार कोटींचं नुकसान
कंगाल पाकिस्तानने पुन्हा हात पसरले, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मागितले 11 हजार कोटी
सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलंय, तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबतच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य
IND vs SA Women – सामना हातातून निसटलाच होता! स्नेह राणाने पंजा फिरवला अन् टीम इंडियाने विजय साजरा केला
Summer Tips- उन्हाळ्यात बडीशेप खाणे का फायदेशीर आहे? वाचा सविस्तर