राज्यात आठ लाख लाडक्या बहीणींना आता दीड हजार ऐवजी फक्त 500 रुपये, राज्य सरकारचा निर्णय
राज्यात आठ लाख लाडक्या बहिणींच्या योजनेचे पैसे सरकराने कमी केले आहेत. या आठ लाख लाभार्थी महिला आधीपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत होते.
टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. या आठ लाख लाडक्या बहिणींना आता दीड हजार ऐवजी 500 रुपये मिळणार आहे. या महिला लाभार्थ्यांना आधीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आधीच एक हजार रुपये मिळत होते. लाडकी बहीण योजनेतून या महिलांना आधी दर महिन्याला दीड हजार रुपये मिळत होते.
राज्य सरकारने सर्व लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 2.63 कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता. त्यापैकी 11 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले असून आता फेब्रुवारीपर्यंत 2.52 लाख महिला या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यानंतर पुन्हा अर्ज छाननी केल्यानंतर 10 लाख महिला या योजनेतून बाहेर पडल्या. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये 2.46 लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.
लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर आर्थिक ताण पडतोय असे सांगितल जात आहे. सध्या राज्यावर 9.3 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. तसेच यंदाच्या बजेटमध्ये लाडकी बहीणसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List