काश्मीरला यायचं असेल तर कलमा शिक, नाहीतर…; पाकिस्तानी मित्राने अभिनेत्रीला दिला होता इशारा
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर बॉलिवूड सातत्याने तीव्र प्रतिक्रिया देत आपला विरोध नोंदवत आहे. कलाकार या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहेत. देशभरात या हल्ल्यावर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. काही तारे-तारकांनी हल्ल्यापूर्वी काश्मीरच्या नयनरम्य खोऱ्यांमध्ये काही शांत क्षण घालवले होते. दक्षिण आणि हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री देखील काश्मीरला जाणार होती. पण या हल्ल्यानंतर ती प्रचंड घाबरली. काश्मीरला जावं की न जावं या धर्मसंकटात सापडलेल्या अभिनेत्रीने तिच्या एका मित्राचा सल्ला मागितला, पण मिळालेल्या उत्तराने ती संभ्रमात पडली होती..
तुझा धर्म काय आहे… कलमा वाच… असे म्हणत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर ज्या पद्धतीने गोळ्या झाडल्या, तो वेदनादायी प्रसंग कोणीच विसरू शकणार नाही. पहलगाममध्ये फिरायला गेलेल्या लोकांना बंदूकधारी दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर अभिनेत्री पायल घोषने भाष्य केलं आहे. ती म्हणाली की, ती देखील काश्मीरला जाणार होती. तिची संपूर्ण ट्रिपची तयारी झाली होती. तिने तिच्या पाकिस्तानी मित्राशी या ट्रिपबाबत चर्चा केली तेव्हा त्याने तिला ‘इशारा’ दिला होता.
वाचा: शिमला करार नेमका काय आहे? जो रद्द करण्याची धमकी पाकिस्तान देत आहे
काश्मीर ट्रिपसाठी पाकिस्तानी मित्राचा सल्ला मागितला होता
फ्री प्रेस जर्नलच्या एका अहवालानुसार, पायल घोषने या हल्ल्याच्या आठवड्यापूर्वीच काश्मीरची ट्रिप बुक केली होती. दहशतवादी हल्ल्यानंतर ती दुविधेत पडली की पुढे जावं की नाही. पण तिच्या एका पाकिस्तानी मित्राने तिला असा मेसेज पाठवला की ती घाबरली.
कलमा शिक, नाहीतर परिणाम भोगण्यासाठी तयार राहा
ती म्हणाली, ‘आधीच खूप अनिश्चितता आहे आणि या सगळ्यामध्ये जेव्हा तुम्हाला अशा गोष्टी ऐकाव्या लागतात, ज्या अप्रत्यक्षपणे सूचित करतात की तुम्ही तुमच्या स्वतःच्या देशात सुरक्षित नाही, तेव्हा नक्कीच राग येतो. त्याने मला ‘इल्म अल-कलाम’ शिकण्यास सांगितलं किंवा परिणाम भोगण्यासाठी तयार राहायला सांगितलं. ‘अंजाम’ म्हणजे तो खरंच काय सांगू इच्छित होता? हे ऐकून मी खूप नाराज झाले होते आणि संतापले होते. ही घटना पाकिस्तानमधील लोकांसाठी खिल्लीचा विषय बनली आहे.’
अशा मैत्रीचा पश्चाताप
पायल पुढे म्हणाली, ‘अशा मानसिकतेच्या लोकांशी मैत्री केल्याचा मला पश्चाताप आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्या कुटुंबांसाठी मी प्रार्थना करते आणि ज्या आत्म्यांना आम्ही गमावले त्यांच्यासाठीही प्रार्थना करते. देव आम्हा सर्वांचं रक्षण करो.’
इन्स्टा स्टोरीवरही व्यक्त केला राग
पायलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही लिहिलं, ‘माझ्या एका पाकिस्तानी अभिनेता मित्राने मला सांगितलं की, काश्मीरला यायचं असेल तर इल्म अल-कलाम शिक, नाहीतर परिणाम भोगण्यासाठी तयार राहा… हे ऐकून मी संतापले आहे आणि नाराज आहे…’
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List