पहलगाम हल्ला, शत्रुघ्न सिन्हा यांच्या वादग्रस्त विधानावर लोकांचा संताप; म्हणाले, ‘यांचा तर जावईच…’
Shatrughan Sinha On Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर बॉलिवूड सतत तीव्र टिप्पण्या देऊन निषेध व्यक्त करत आहे. या हल्ल्याचा बॉलिवूड सेलिब्रिटी तीव्र निषेध करत आहेत. त्याचबरोबर, देशभरात या हल्ल्याबद्दल प्रचंड संताप आहे. दरम्यान, बॉलिवूडचे ‘कालीचरण’ म्हणजेच शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यासाठी त्यांना ट्रोल केले जात आहे. जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांना या दहशतवादी हल्ल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी याला प्रचार युद्ध म्हटलं… ज्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आले.
काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?
दहशतवादी हल्ल्याबद्दल प्रश्न विचारताच शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘हिंदू हिंदू काय म्हणताय? तिथे हिंदू-मुस्लीम सर्व भारतीय आहेत. ही गोदी मीडिया प्रमाणापेक्षा जास्तच चालवतेय. आमचे मित्र माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या गटाकडून हे प्रचारकी युद्ध जास्तच चालवलं जातंय. हे अती होतंय. हा मुद्दा संवेदनशील आहे हे मला मान्य आहे. त्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आपण असं कोणतंच वक्तव्य करू नये किंवा काही करू नये, ज्यामुळे तणाव आणखी वाढेल. सध्या जखमींवर औषधोपचाराची गरज आहे.’ सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर अनेकांनी निशाना साधला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘हा का काही बोलेल, त्यांच्या जावईच मुस्लिम आहे.’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘तर सांगा ना… धर्म विचारुन का मारलं…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘हा पाकिस्तानी दलाल… याची मुलगी पण पाकिस्तानी दलाल आहे..’ सोशल मीडियावर सध्या सर्वत्र शत्रुघ्न सिन्हा यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त होत आहे.
पहलगाम हल्ला…
मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात अनेकांना प्राण गमवावे लागले. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला. इतकंच नव्हे तर पर्यटकांना कुराणमधील कलमा म्हणण्यास सांगितलं गेलं. ज्यांना म्हणता आलं नाही, त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचं समजतंय.
पहलगाममधील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. बैसरन खोऱ्यात टेकडीवरून खाली उतरून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. 40 पर्यटकांना घेरून त्यांना लक्ष्य केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List