सैफ अली खानचा लेक साराच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स; किसिंग सीन्सची चर्चा
चाहते आता बॉलिवूडमध्ये नवीन चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. त्यातील एक चित्रपट म्हणजे सैफ अली खानचा ‘ज्वेल थीफ’. चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 25 एप्रिल रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात जयदीप अहलावत देखील दिसणार आहे. या चित्रपटातील एक गाणे रिलीज झाले आहे, ज्यामध्ये सैफचे रोमँटिक सीन्स आहेत. त्याच्यासोबत रोमान्स करणारी अभिनेत्री ही त्याची लेक सारा अली खानपेक्षा केवळ 5 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे ती अभिनेत्री साराच्याच वयाच्या जवळपास आहे. पण याच अभिनेत्रीसोबतच सैफची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
सैफचा मुलीच्या वयाच्या अभनेत्रीशी रोमान्स
सैफसोबतची ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून निकिता दत्ता आहे. जिने ‘कबीर सिंग’ आणि ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ मध्ये काम केले आहे. 17 एप्रिल रोजी ‘ज्वेल थीफ’चे ‘इल्झाम’ हे गाणे रिलीज झाले आहे. गाण्यात सैफ आणि निकिताची जोडी तशी छान दिसतेय. गाण्यात सैफ निकितासोबत रोमान्स करताना दिसतोय. दरम्यान या गाण्यात दोघांचे अनेक किसींग दृश्य आहेत.
चित्रपटामधील ‘इल्झाम’ गाणे ठरतंय लोकप्रिय
निकिता 34 वर्षांची आहे, तर सैफची मुलगी सारा अली खान 29 वर्षांची आहे. या गाण्यात जयदीपची देखील झलक दिसतेय. या गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिले आहेत. शिल्पा राव आणि विशाल मिश्रा यांनी आवाज दिला आहे. ‘इल्झाम’ हे ‘ज्वेल थीफ’ चित्रपटाचे दुसरे गाणे आहे. याआधीही निर्मात्यांनी ‘जादू’ नावाचे एक गाणे रिलीज केले होते जे लोकांना खूप आवडले होते.
क्राइम थ्रिलर चित्रपटात सैफची जादू चालणार?
या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. निर्मात्यांनी 14 एप्रिल रोजी ट्रेलर रिलीज केला. ज्यामध्ये सैफ आणि जयदीप दोघेही छान दिसत होते. ट्रेलर पाहिल्यानंतर असे वाटले की दोघेही या चित्रपटाद्वारे लोकांवर जादू करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, या क्राइम थ्रिलर चित्रपटात दोघांनाही पाहणे मनोरंजक असेल.
‘ज्वेल थीफ’चे दिग्दर्शन कुकी गुलाटी आणि रुबी ग्रेवाल यांनी मिळून केलं आहे. ‘पठाण’, ‘फायटर’ आणि ‘वॉर’ सारखे चित्रपट दिग्दर्शित करणारे सिद्धार्थ आनंद देखील या चित्रपटाशी जोडलेले आहेत. त्यांनी त्यांच्या पत्नी ममता आनंद यांच्यासोबत या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List