उपासमारीने त्रस्त शाहरुख खानची ऑनस्क्रिन आजी, रुग्णालयात सोडून गेला मुलगा, 91 व्या वर्षी वेदनादायक अंत
Achala Sachdev painful death story: झगमगत्या विश्वाचं आकर्षण अनेकांना असतं. सेलिब्रिटींकडे असणारा पैसा, प्रसिद्धी आणि चाहत्यांची संख्या चाहत्या अवाक् करत असते. पण असंख्या चाहते असून देखील काही सेलिब्रिटी शेवटच्या क्षणी एकटेच असतात. असंच काही अभिनेता शाहरुख खान याच्या ऑनस्क्रिन आजीबाबत देखील झालं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री अचल सचदेवा यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. 40 – 50 च्या दशकात आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य केलं. आपल्या अभिनयाने सर्वांना राज्य करणाऱ्या अभिनेत्रीने 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अचल यांचा अंत फार वाईट होता.
‘कभी खुशी कभी गम’, ‘दिल वाले दुल्हनिया’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये आजीच्या भूमिकेला न्याय देत अचल यांनी चाहत्यांना भावूक केलं. पण 40 आणि 50 च्या काळात अचल यांनी अनेक सुपहीट सिनेमांमध्ये देखील काम केलं. ‘वक्त’, ‘मंजिल’, ‘कल्पना’, ‘बंधन’ आणि ‘प्रेम पुजारी’ यांसारख्या सिनेमात तर अचल सचदेवा यांनी मुख्य भूमिता साकारली.
‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ‘ सिनेमाला कोणाला आठवत नसेल… सिनेमातील प्रत्येक कलाकार आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. दोन्ही सिनेमात त्यांनी आजीची भूमिका साकारली. अचल यांचे भावूक करणारे सीन पाहिल्यानंतर आजही चाहत्यांच्या डोळ्यात पाणी येतं.
अचल सचदेवा तरुणपणापासून वृद्धापकाळापर्यंत काम करत राहिल्या. कायम आजू-बाजूला चाहत्यांचा बोलबाल असलेल्या अचल शेवटच्या क्षणी मात्र एकट्याच पडल्या. पतीच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. पतीच्या निधनानंतर अचल यांची प्रकृती देखील खालावली. त्यानंतर त्यांची प्रकृती कधी स्थिर झालीच नाही.
शेवटच्या क्षणी त्यांच्या मुलांनी देखील त्यांची साथ सोडली. फक्त एक नोकर होता ज्याने अचल यांची काळजी घेतली. अचल यांची प्रकृती अधिक गंभीर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा देखील रुग्णालयात आईला एकटीला टाकून मुलगा पळून गेला. शेवटच्या क्षणी देखील त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं. अखेर वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List