‘घटस्फोट लवकरच होईल’ म्हणणाऱ्यावर भडकली सोनाक्षी सिन्हा; थेट म्हणाली ‘तुझे आईवडील..’
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने गेल्या वर्षी जून महिन्यात बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी आंतरधर्मीय लग्न केलं. सोनाक्षी हिंदू आहे तर झहीर मुस्लीम आहे. यामुळे अनेकदा तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. परंतु सोनाक्षीसुद्धा अशा टीकाकारांना तिच्याच अंदाजात उत्तर देताना पहायला मिळते. नुकत्याच एका युजरने सोनाक्षीच्या एका फोटोवर तिच्या घटस्फोटाबाबत कमेंट केली. या कमेंटकडे दुर्लक्ष न करता सोनाक्षीने त्याला सडेतोड उत्तर द्यायचं ठरवलं. संबंधित युजरला तिने दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.
‘तुझा घटस्फोट तुझ्या खूप जवळ आला आहे’, अशी कमेंट एका युजरने सोनाक्षीच्या फोटोवर केली. त्यावर सोनाक्षीने उत्तर देत लिहिलं, ‘आधी तुझे आई-वडील घटस्फोट घेतील, मग आम्ही. प्रॉमिस (वचन).’ तिच्या या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं असून त्यावर लाइक्सचा वर्षाव होत आहे. सोनाक्षी आणि झहीरने जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं. त्यांच्या लग्नाच्याही आधी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग झाली होती. परंतु वेळोवेळी तिने टीकाकारांना उत्तर देऊन त्यांचं तोंड बंद केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी आणि झहीर यांना एका क्लिनिकबाहेर एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये ‘गुड न्यूज’ची चर्चा होऊ लागली होती. लग्नाच्या सहा महिन्यांतच सोनाक्षी गरोदर राहिली की काय, असा सवाल नेटकऱ्यांनी केला होता. त्यानंतर लगेचच सोनाक्षी आणि झहीरने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली होती. यावरही सोनाक्षीने एका मुलाखतीत बिनधास्तपणे उत्तर दिलं होतं. “मी इथे स्पष्ट करू इच्छिते की मी प्रेग्नंट नाही. मी फक्त जाड झाली आहे. त्यादिवशी एका व्यक्तीने झहीरला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावरून आम्हाला समजलं की काहीतरी गडबड आहे. आम्ही आमचं लग्न एंजॉय करू शकत नाही का,” असा सवाल तिने केला होता.
सोनाक्षी पुढे म्हणाली, “आमच्या लग्नाला फक्त सहा महिने झाले आहेत आणि प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास आम्ही दोघं प्रवासातच खूप व्यस्त आहोत. आम्ही एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतोय आणि सतत कोणत्या ना कोणत्या लंच किंवा डिनरला जातोय.” इन्स्टाग्रामवरील फोटोबाबत झहीरने सांगितलं, “गंमत म्हणजे या चर्चा एका साध्या फोटोमुळे सुरू झाल्या. आम्ही आमच्या पाळीव श्वानासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि त्यावरून चर्चा सुरू झाली की, ओह.. ती प्रेग्नंट आहे. या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे, असा मला प्रश्न पडला होता.” झहीरचं बोलणं झाल्यावर सोनाक्षी म्हणते, “लोक खूप वेडे आहेत.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List