‘हा’ बॉलिवूड चित्रपट पाकिस्तानमध्ये घालतोय धुमाकूळ; पाकिस्तानी लोकंही करतायत या अभिनेत्याचं कौतुक

‘हा’ बॉलिवूड चित्रपट पाकिस्तानमध्ये घालतोय धुमाकूळ; पाकिस्तानी लोकंही करतायत या अभिनेत्याचं कौतुक

बॉलिवूडमधील असे अनेक चित्रपट आहेत जे भारतात नाही पण पाकिस्तानात धुमाकूळ घालतात. पाकिस्तानात अनेक बॉलिवूड चित्रपट रिलीज होत असतात. असाच एक बॉलिवूड चित्रपट जो भारतातील बॉक्सऑफिवर चालला नाही पण पाकिस्तानात धुमाकूळ घालतोय.हा चित्रपट म्हणजे शाहिद कपूरचा ‘देवा’.

पाकिस्तानात धुमाकूळ घालतोय हा चित्रपट 

हा चित्रपट पाकिस्तानमधील नेटफ्लिक्सवरील ट्रेंडिंग चित्रपटांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, जो एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन रोशन अँड्र्यूज यांनी केले आहे. शाहिदचा ‘देवा’ चित्रपट भारतात काही खास कामगिरी करू शकला नाही, पण पाकिस्तानमध्ये तो नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर आहे.हा चित्रपट 2o13 मध्ये आलेल्या मल्याळम चित्रपट ‘मुंबई पोलिस’ चा रिमेक आहे. या चित्रपटात शाहिदसोबत पूजा हेगडे आणि पावेल गुलाटी देखील आहेत.

शाहिद कपूरचा अ‍ॅक्शन थ्रिलर ‘देवा’

शाहिद कपूरचा अ‍ॅक्शन थ्रिलर ‘देवा’ चित्रपट 31 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटात बऱ्याच दिवसांनंतर शाहिदचा अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळाला होता, पण, शाहिदच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. माहितीनुसार, 50 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं जगभरात 51.73 कोटींची कमाई केली आहे. तर देशात फक्त 37.86 कोटींचा गल्ला जमवला. पण हा चित्रपट पाकिस्तानात मात्र धुमाकूळ घालतोय. देवा पाकिस्तानमधील नेटफ्लिक्सवरील ट्रेंडिंग चित्रपटांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तेथील प्रेक्षकांना शाहिदचा अभिनयही पसंतीस उतरला असून त्यांनी शाहिदचे खूप कौतुकही केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)


शाहिदच्या देवाप्रमाणे अजय देवगनचा ‘आझाद’ चित्रपट पाकिस्तानात प्रेक्षकांच्या पसंतीस 

दरम्यान ‘देवा’ चित्रपट आज मार्चपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला असून तिथेही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात शाहिदने पोलीस अधिकारी देव अंब्रेची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत प्रमुख भूमिकेत अभिनेत्री पूजा हेगडे आहे. शाहिदच्या देवाप्रमाणे अजय देवगनचा ‘आझाद’ चित्रपट पाकिस्तानात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच मल्याळम चित्रपट ‘ऑफिसर ऑन ड्यूटी’ हा चित्रपट देखील पाकिस्तानात ट्रेंडिंगमध्ये आहे. हा एक क्राइम अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन जीतू अशरफ यांनी केले आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

US Plane Crashed – फ्लोरिडामध्ये विमान अपघात; तीन जणांचा मृत्यू US Plane Crashed – फ्लोरिडामध्ये विमान अपघात; तीन जणांचा मृत्यू
अमेरिकेत पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडली आहे. दक्षिण फ्लोरिडामध्ये एक छोटे विमान कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण...
ईडीने लोकांच्या हक्कांचाही विचार करावा; सुप्रीम कोर्टाने टोचले कान
रितीरिवाजाचे वचन देऊन रजिस्टर्ड लग्न करणे फसवणूक नव्हे! हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा
Jammu Kashmir – किश्तवाडमध्ये चकमक, सुरक्षा दलांकडून जैशच्या कमांडरसह तीन दहशतवादी ठार
EVM हॅक होऊ शकतं, अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर विभागाच्या प्रमुखांचा दावा
भर समुद्रात थरार; समुद्राच्या लाटांमुळे बोटीला पडले छिद्र, स्पीड बोटीमुळे वाचले 130 प्रवाशांचे प्राण
IPL 2025 – पहिलं गुडाळलं अन् मग चोपलं; CSK चा सुपडा साफ करत KKR चा मोठा विजय