शर्मिला टागोर नातू इब्राहिमच्या चित्रपटाला म्हणाल्या ‘बकवास अजिबात चांगला नव्हता…”, तर साराचं केलं कौतुक

शर्मिला टागोर नातू इब्राहिमच्या चित्रपटाला म्हणाल्या ‘बकवास अजिबात चांगला नव्हता…”, तर साराचं केलं कौतुक

अभिनेता सैफ अली खान याची मुलगी सारा अली खानने बॉलिवूडमध्ये आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. त्यानंतर आता अभिनयात आपलं नशीब आजमवण्यासाठी सैफचा मुलगा इब्राहिम अली खानही प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. इब्राहिम अली खान याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. ‘नादानियां’ या चित्रपटातून त्याने पदार्पण केलं. 7 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात खुशी आणि इब्राहिम अली खान यांची जोडी प्रेक्षकांच्या फारशी पसंतीस उतरली नाही. तसेच चित्रपटाची कथाही एवढी खास नसल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.

इब्राहिमच्या चित्रपटावर आजी शर्मिला टागोर यांची प्रतिक्रिया

दरम्यान इब्राहिमच्या चित्रपटावर त्याची आजी तथा अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शर्मिला यांना नातवाचा चित्रपट आवडला नसल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसून आलं. कारण आजीने तिच्या नातवाच्या पदार्पणावर आणि चित्रपटावर टीका केली आहे. ‘नादानियां’ बद्दल आपले मत व्यक्त करताना शर्मिला टागोर यांनी नातू इब्राहिमच्या चित्रपटावर टीका करत चित्रपट चांगला नसल्याचं म्हटलं आहे. सर्वप्रथम, शर्मिला टागोर यांनी त्यांच्या नातवाचे आणि नातीचे कौतुक केले आणि म्हणाल्या, ‘सारा आणि इब्राहिम खूप छान काम करत आहेत.’ यानंतर त्यांनी नादानियांवरील त्यांची प्रतिक्रिया दिली.

“इब्राहिमचा चित्रपट चांगला नव्हता, पण….”

शर्मिला म्हणाल्या की, ‘इब्राहिमचा चित्रपट चांगला नव्हता, पण तो चित्रपटाच खूप देखणा दिसत होता. इब्राहिमने त्याचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. या गोष्टी सर्वांसमोर सांगू नयेत, पण खरं सांगायचं तर चित्रपट तितकासा नक्कीच चांगलं नव्हता. काहीही असो, शेवटी चित्रपटाचा दर्जा चांगला असायला हवा होता आणि तो तसा नव्हता.” असं म्हणत एकंदरितच त्यांना नातवाचा अभिनय आणि चित्रपट दोन्हीही आवडले नसल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसून आलं. पण नातवाच्या अभिनयावर थेट टीका करणं शक्य नसल्यानं त्यांनी चित्रपटाच्या कथेवरून विषय संपवला. त्यांनी एका मुलाखतीत याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

आजीकडून नात सारा अली खानचे मात्र भरभरून कौतुक

तसेच शर्मिला यांनी नात सारा अली खानचे मात्र भरभरून कौतुक केले. ‘सारा खूप मेहनत करते आणि ती खूप काही करू शकते.’असं म्हणत त्यांनी साराला उत्तम अभिनेत्री म्हणून संबोधलं. दरम्यान ‘नादानियाँ’ नेटफ्लिक्सवर आल्यापासून या चित्रपटावर बरीच टीका झाली आहे आणि बहुतेक टीका इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या अभिनयावर होत आहे. साराने इंस्टाग्रामवर विविध देशांमध्ये ट्रेंड होत असलेल्या चित्रपटाचे स्क्रीनशॉट शेअर करून तिच्या भावाला पाठिंबा दिला, तर इब्राहिमची मावशी सोहा अली खानने देखील त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्याला, ‘कोणतीही टीका स्वीकारणे आणि तुमच्या कौशल्यांवर काम करणे महत्वाचे आहे.’ असा सल्लाही दिला.

इब्राहिम आणि खुशीच्या अभिनयावर टीका

दरम्यान चित्रपटात इब्राहिमच्या पालकांची भूमिका साकारणारे कलाकार दिया मिर्झा आणि जुगल हंसराज यांनी या टीकेचे कारण ‘विशेषाधिकार’ संस्कृती असल्याचे म्हटले आहे. त्याच वेळी, सोनू सूद, हंसल मेहता आणि करण जोहर सारख्या इतर अनेक इंडस्ट्रीतील लोकांनी इब्राहिम आणि खुशीच्या अभिनयावर केलेल्या टिप्पण्यांबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

यवतमाळमध्ये पाण्याकरिता वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे पितळ उघड यवतमाळमध्ये पाण्याकरिता वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे पितळ उघड
‘हर घर जल’ योजनेतून शहरांबरोबरच गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्याच्या मोदी सरकारच्या योजनेचे पितळ उघडे पाडणारी हृदयद्रावक घटना यवतमाळमध्ये...
कोण नामदेव ढसाळ? या कार्यक्रमाचे आयोजन
पक्ष फोडण्यासाठी टोळ्यांसारखा पोलिसांचा वापर केला जातोय! उद्धव ठाकरे यांचे परखड मत
हिंदी सक्ती बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच! आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला
बीड पुन्हा हादरले; प्रदूषणाविरोधात लढणाऱ्या महिलेला लाठ्याकाठ्यांनी अमानुष मारहाण
मंत्री अतुल सावेंना दणका मुख्यमंत्र्यांनी कामे रोखली, नांदेड जिल्ह्यातील 7 कोटी 25 लाख रुपयांच्या तांडा वस्तीच्या कामांना स्थगिती
मोदींच्या घरकुल योजनेत साडेचारशे कोटींचा घोटाळा; मिंधेंच्या सत्ताकाळात कंत्राटदारांच्या तिजोऱ्या भरल्या! बदलापुरात आठ लाखांचे घर 17 लाखांवर