ऐश्वर्या राय सकाळी किती वाजता उठते माहितीये? अजिबात खंड पडत नाही, अन् तेच आहे तिचं ब्यूटी सिक्रेट

ऐश्वर्या राय सकाळी किती वाजता उठते माहितीये? अजिबात खंड पडत नाही, अन् तेच आहे तिचं ब्यूटी सिक्रेट

बॉलिवूडची ‘गॉर्जियस क्वीन’ ऐश्वर्या राय बच्चन केवळ तिच्या अभिनय कौशल्याने आणि सौंदर्यानेच नव्हे तर तिच्या स्टायलिश लूकनेही लाखो लोकांच्या मनावर राज्य करते. ही ब्यूटी क्वीन तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या साधेपणासाठीही जगभर ओळखली जाते. मध्यंतरी ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधान आलं होतं. मात्र या दोघांनीही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिला नाही. दरम्यान जवळपास सर्वच कार्यक्रमांमध्ये त्यांच्या एकत्र दिसण्याने या अफवांना आळा बसला.

ऐश्वर्या राय तिच्या शिस्तप्रिय सवयीसाठीही ओळखली जाते.

ऐश्वर्या राय तिच्या शिस्तप्रिय सवयीसाठीही ओळखली जाते. तिला सर्व कामे परफेक्ट करायला आवडतात. तसेच तिच्या सौंदर्याचे अजून एक रहस्य म्हणजे तिची अजून एक अतिशय साधी पण प्रभावी सवय आहे. ऐश्वर्या राय तिच्या दैनंदिन दिनचर्येमुळे एक आदर्श मानली जाते. एका मुलाखतीत, तिने तिच्या दैनंदिन दिनचर्या आणि तिच्या यशाचे रहस्य सांगितले होते.

ऐश्वर्या रोज किती वाजता उठते?

एका मुलाखतीत ऐश्वर्या रायने सांगितले की तिचा दिवस खूप लवकर सुरू होतो. ऐश्वर्या दररोज पहाटे 5.30 वाजता उठते आणि ती वर्षानुवर्षे ही दिनचर्या पाळत आहे. शूटिंग असो, कार्यक्रम असो किंवा मुलाखती असो, ती सर्वकाही पूर्ण परिपूर्णतेने करते आणि या शिस्तबद्ध जीवनशैलीचा सर्वात मोठा भाग म्हणजे सकाळी लवकर उठणे. “माझा दिवस नेहमीच पहाटे ५:३० वाजता सुरू होतो आणि ती एक ठरलेली सवय आहे,. माझा दिवस हा 24 तासांचा नसतो तर 48 तासांचे काम 24 तासांत पूर्ण करावे लागते”

“माझ्या आयुष्यात इतक्या गोष्टी आहेत की…..”

पुढे ती म्हणाली की, “माझ्या आयुष्यात इतक्या गोष्टी आहेत की मी त्या सर्व एकाच पॅटर्नमध्ये बसवू शकत नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे: माझा दिवस खूप लवकर सुरू होतो त्यामुळे मी ती सर्व कामे करण्यासाठी वेळ काढू शकते.” तिच्या मते “आम्ही महिला अनेक भूमिका बजावतो आणि कामाचे तास काय आहेत याचा आम्ही विचार करत नाही. आणि फक्त सर्वकाही योग्यरित्या आणि वेळेवर झाले आहे याची खात्री करतो.” असं म्हणत ती तिचा दिवस एवढ्या लवकर का आणि कसा सुरु करते याबद्दल सांगितलं आहे.

ऐश्वर्याच्या सौंदर्याचा खरा मंत्र 

दरम्यान ऐश्वर्याचा असा विश्वास आहे की सकारात्मक दृष्टिकोन असणे हाच खरा मंत्र आहे. ती म्हणते की, प्रत्येक दिवस सकारात्मकतेने जगला पाहिजे. वर्तमानात जगणे आणि प्रत्येक क्षण पूर्णपणे अनुभवणे अत्यंत महत्वाचे आहे. ही वृत्ती तिला आतून सुंदर बनवते, ज्याचा परिणाम तिच्या चेहऱ्यावरही स्पष्टपणे दिसून येतो. त्यामुळे ऐश्वर्याच्या सौंदऱ्यांच्या रहस्यांमध्ये एक रहस्य म्हणजे पहाटे लवकर उठणे जेकी आपल्या घरातले मोठेही नेहमी सांगत असतात.

ऐश्वर्याच्या या मंत्राचा फायदा…

सकाळी लवकर उठल्याने शरीराची सर्केडियन लय (झोपेचे आणि जागे होण्याचे नैसर्गिक चक्र) संतुलित राहतात, ज्यामुळे चांगली झोप येते आणि त्वचा देखील निरोगी राहते. याव्यतिरिक्त, शरीराला स्वतःशी जोडण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी आणि दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी पहाटे पुरेसा वेळ मिळतो. यामुळे त्वचा चमकदार होते, केसांची गुणवत्ता सुधारते आणि मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

यवतमाळमध्ये पाण्याकरिता वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे पितळ उघड यवतमाळमध्ये पाण्याकरिता वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे पितळ उघड
‘हर घर जल’ योजनेतून शहरांबरोबरच गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्याच्या मोदी सरकारच्या योजनेचे पितळ उघडे पाडणारी हृदयद्रावक घटना यवतमाळमध्ये...
कोण नामदेव ढसाळ? या कार्यक्रमाचे आयोजन
पक्ष फोडण्यासाठी टोळ्यांसारखा पोलिसांचा वापर केला जातोय! उद्धव ठाकरे यांचे परखड मत
हिंदी सक्ती बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच! आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला
बीड पुन्हा हादरले; प्रदूषणाविरोधात लढणाऱ्या महिलेला लाठ्याकाठ्यांनी अमानुष मारहाण
मंत्री अतुल सावेंना दणका मुख्यमंत्र्यांनी कामे रोखली, नांदेड जिल्ह्यातील 7 कोटी 25 लाख रुपयांच्या तांडा वस्तीच्या कामांना स्थगिती
मोदींच्या घरकुल योजनेत साडेचारशे कोटींचा घोटाळा; मिंधेंच्या सत्ताकाळात कंत्राटदारांच्या तिजोऱ्या भरल्या! बदलापुरात आठ लाखांचे घर 17 लाखांवर