एसटीच्या अस्वच्छ हॉटेल थांब्यांवर गंडांतर, परिवहनमंत्र्यांचे आदेश जारी

एसटीच्या अस्वच्छ हॉटेल थांब्यांवर गंडांतर, परिवहनमंत्र्यांचे आदेश जारी

एसटीच्या प्रवासादरम्यान एसटी बसेसना ठराविक थांबे दिलेले असतात. या थांब्यातील हॉटेलात अगदी बेचव आणि महागडे जेवण प्रवाशांच्या माथी मारले जात असते. महिला प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीचे ठिकाण देखील असते. त्यामुळे अशा सर्व हॉटेल आणि मॉटेलची झाडाझडती होणार आहे. आणि प्रवाशांना सकस आणि किफायतशीर जेवण मिळत नसेल तर अशा थांब्यांची तपासणी करुन ती रद्द करावेत असे आदेश परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसात सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांना केल्या आहेत.

लांबपल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा -नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्या बाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेल वरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एस टी प्रवासांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत.

राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करा

या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला याबाबत कडक धोरण स्वीकारण्याची निर्देश दिले आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याची कोणती तडजोड न करता संबंधित हॉटेल-मोटेल थांब्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. तसेच सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्याचे नव्याने सर्वेक्षण करून तेथील प्रवासी सुविधांची चाचपणी करावी. जे थांबे प्रवाशांना योग्य सुविधा देत नसतील त्यांच्यावर कारवाई करावी आणि नव्या थांब्यांना मंजुरी द्यावी तसेच याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या १५ दिवसात आपल्याला सादर करावा असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे..

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखली, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून पुण्यात राडा काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखली, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून पुण्यात राडा
‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून...
बँक खात्यावर मारला डल्ला
व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट प्रोफाइल फोटो लावून 30 लाख रुपये उकळले 
मला माफ करा… पण? ब्राह्मणांवर दिलेल्या विधानानंतर अनुराग काश्यप नरमला
अमेरिकेत हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा हिट-अँड-रनमध्ये मृत्यू, कुटुंबावर दुखाचा डोंगर
प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडली, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
IPL 2025 – टीम डेव्हिडची झुंजार खेळी व्यर्थ, पंजाबचा बंगळुरूवर 5 विकेटने दणदणीत विजय