नागपूरमध्ये आज ‘सद्भावना शांती मार्च’
राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक जातीधर्माच्या नावाखाली अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूरमध्ये मागील महिन्यात धार्मिक हिंसाचार उफाळला होता त्यामागे याच शक्ती होत्या. राज्यात शांतता नांदावी आणि सामाजिक सद्भाव वाढीस लागला पाहिजे याच हेतूने कॉँग्रेसच्या वतीने बुधवारी 16 एप्रिल रोजी नागपूरमध्ये ‘सद्भावना शांती मार्च’ काढण्यात येणार आहे. प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात हा सद्भावना शांती मार्च निघणार आहे. यामध्ये प्रभारी रमेश चेन्नीथला, सहप्रभारी कुणाल चौधरी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List