घोटाळेबाज मेहुल चोक्सीची बाजू मांडणार युरोपातील महागडा वकील
पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 13 हजार 500 कोटी रुपयांचा चुना लावून देशाबाहेर पळून गेलेल्या कर्जबुडव्या मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी अटक केली. हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या चोक्सीची बाजू युरोपातील सर्वात महागडा वकील मांडणार असल्याचे समोर आले आहे. पॉल बिकायथ आणि त्यांचा मुलगा सायमन बिकायथ हे युरोपातील सर्वात महागडे वकील म्हणून गणले जातात. त्यांना चोक्सीने अटक आणि प्रत्यार्पणाविरोधात आपली बाजू मांडण्यासाठी नेमले आहे. पॉल बिकायथ यांनी मानवाधिकार आणि प्रत्यार्पणाशी संबंधित युरोपातील अनेक बडय़ा प्रकरणांमध्ये युक्तिवाद केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List