ठाण्यात 665 बेकायदा होर्डिंग हटवले, पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई
शहरातील रस्त्याच्या दुभाजकांवर, पादचारी मार्गावर तसेच झाडांवर लावण्यात आलेल्या 665 बेकायदा होर्डिंग पालिकेने हटवले आहेत. पालिकेच्या वतीने पोस्टर्स, बॅनर्स आणि बेकायदेशीर फलक हटवण्याची विशेष मोहीम आज राबवण्यात आली. आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार एकाच दिवशी बेकायदा पोस्टर्स, बॅनर्सवर कारवाई करण्यात आली.
ठाणे पालिकेचा अतिक्रमण विभाग व प्रभाग समितीतील कर्मचारी यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली. शहरातील पोस्टर्स, होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून अनेकदा वाऱ्यामुळे अशा प्रकारचे होर्डिंग्ज पडून दुर्घटना होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व बेकायदा होर्डिंग्ज आयुक्तांच्या निर्देशानुसार हटवण्यात येत असून ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहील असे राव यांनी सांगितले. विजेच्या खांबावर, झाडांवर, रस्त्याच्या दुभाजकांवर, रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले धोकादायक बॅनर्स, फलक काढण्यात आले आहेत. या कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे, सर्व प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त तसेच प्रभाग समितीतील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List