आठ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार ऐवजी पाचशे रुपये
विधानसभा निवडणुकांपूर्वीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांऐवजी 2100 रुपये जमा करण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती, पण या घोषणेची पूर्तता नजीकच्या काळात होण्याची एकीकडे शक्यता दुरावली आहे, तर दुसरीकडे एप्रिल महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप जमा झालेले नाहीत. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये अस्वस्थता आहे. त्याचवेळेस दुहेरी योजनांचा लाभ घेणाऱया आठ लाख लाडक्या बहिणींना आता केवळ पाचशे रुपयेच मिळणार असल्याचे वृत्त आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List