“तो ड्रग्जच्या नशेत धुंद होता अन् त्याने सर्वांसमोर…”, प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत सहअभिनेत्याचं गैरवर्तन

“तो ड्रग्जच्या नशेत धुंद होता अन् त्याने सर्वांसमोर…”, प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत सहअभिनेत्याचं गैरवर्तन

चित्रपट किंवा मालिकांचे चित्रिकरण सुरू असताना अनेकदा अभिनेत्री, अभिनेत्यांना वाईट अनुभव येतात. सेटवर छेडछाड, गैरवर्तन होते; तरीही आपल्या कारकि‍र्दीवर याचा परिणाम होऊ नये म्हणून अनेक अभिनेत्री गप्प बसतात, तर काही निडर होऊन पुढे येतात. मध्यंतरी ‘मी टू’ या ट्रेंडमुळे अनेक कलाकारांनी आपल्यासोबत झालेल्या गैरप्रकाराची माहिती दिली होती. आताही मल्याळम चित्रपट सृष्टीतील नावाजलेले नाव असलेली 29 वर्षीय अभिनेत्री विन्सी एलोशियस हिने सेटवर आपल्याल घडलेला गैरप्रकाराची माहिती दिली असून ड्रग्ज घेणाऱ्या कलाकारांसोबत काम न करण्याची शपथ घेतली आहे.

केरळमधील पल्लीपूरम चर्चेमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये अभिनेत्री Vincy Aloshious ऑनलाईन सहभागी झाली होती. यावेळी ड्ग्ज घेणाऱ्या कोणत्याही कलाकारासोबत काम करणार नाही असा निर्धारही व्यक्त केला. तिच्या या विधानामुळे सोशल मीडियावर वादाची ठिणगी पडली. यानंतर विन्सीने एक व्हिडीओ शेअर करत चित्रिकरणाच्या सेटवर आपल्यासोबत घडलेला वाईट प्रसंग सांगितला.

मी एका चित्रपटाचे चित्रिकरणात व्यग्र होते. तेव्हा चित्रपटातील प्रमुख अभिनेत्याबाबत मला वाईट अनुभव आला. तो ड्रग्जचे सेवन करायचा आणि विक्षिप्त वागायचा. त्यामुळे त्याच्यासोबत सेटवर काम करणे खूप कठीण झाले होते, असे विन्सी म्हणाली. यावेळी तिने चित्रपटाचे आणि त्या अभिनेत्याच्या नावाचा उल्लेख करणे मात्र टाळले.

चित्रिकरण सुरू असताना माझ्या ड्रेसमध्ये काही समस्या निर्माण झाली. त्यामुळे ड्रेस मला व्यवस्थित करायचा होता. याचवेळी तो अभिनेता माझ्याजवळ आला आणि सर्वांसमोर त्याने माझ्यावर ड्रेसवर हात टाकला आणि तो नीट करू लागला. यामुळे मी खूपच अस्वस्थ झाले, असे विन्सीने सांगितले. याच चित्रपटातील एका दृश्याचे चित्रिकरण सुरू असताना अभिनेत्याच्या तोंडातून पांढरा पदार्थ टेबलावर पडला. त्यामुळे तो ड्रग्ज घेत होता हे अगदीच स्पष्ट झाले. माझ्यासह सेटवरील प्रत्येकाला त्याच्या अशा वागण्याने त्रास होत होता. वैयक्तिक जीवनामध्ये ड्रग्जचे सेवन करणे ही वेगळी गोष्ट आहे, पण याचा तुमच्या व्यावसायिक आयुष्यावर परिणाम होत असेल तर ते अस्वीकार्य आहे, असेही ती म्हणाली. तसेच अशा वातावरणात मला यापुढे काम करायचे नाही, असेही तिने स्पष्ट केले.

माझ्या या भूमिकेमुळे कदाचित मी अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी गमावू शकते. भविष्यात मला जास्त चित्रपटही मिळणार नाही. पण मी जाहीरपणे सांगते की ड्रग्ज घेणार्‍या कलाकारासोबत मी कोणत्याही चित्रपटात काम करणार नाही, असेही विन्सी ठामपणे म्हणाली.

दरम्यान, विन्सीने 2019 मध्ये आलेल्या ‘विकृती’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. ‘रेखा’ या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला केरळ राज्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले होते. यासह ‘जन गण मन’, ‘सौदी वेल्लक्का’, ‘पद्मिनी’ आणि ‘पजंजन प्राणायम’ या गाजलेल्या चित्रपटाही तिने काम केले आहे. नुकतीच ती ‘मारिविलीन गोपुरंगल’ या चित्रपटातही दिसली होती. यात तिने मीनाक्षीची भूमिका साकारली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एसटीच्या अस्वच्छ हॉटेल थांब्यांवर गंडांतर, परिवहनमंत्र्यांचे आदेश जारी एसटीच्या अस्वच्छ हॉटेल थांब्यांवर गंडांतर, परिवहनमंत्र्यांचे आदेश जारी
एसटीच्या प्रवासादरम्यान एसटी बसेसना ठराविक थांबे दिलेले असतात. या थांब्यातील हॉटेलात अगदी बेचव आणि महागडे जेवण प्रवाशांच्या माथी मारले जात...
यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर
उन्हाळ्यात मधुमेही रुग्ण उसाचा रस पिऊ शकतात का? तज्ञ काय सांगतात ?
शाहरुख खानच्या बंगल्यात मुक्काम करण्याची संधी; मिळेल सुपरस्टारसारखा अनुभव, एका दिवसाचे भाडे किती?
40व्या वर्षी सुंदर दिसण्यासाठी आणि निरोगी शरीरासाठी स्वयंपाकघरातील ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर….
मधुमेही रूग्ण दूध पिऊ शकतात का? जाणून घ्या काय सांगतात तज्ञ
दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटण्याचे षडयंत्र, राज्यात शांतता नांदावी यासाठी सद्भावना यात्रेची गरज – हर्षवर्धन सपकाळ