430 कोटींच्या हिऱ्याचा लिलाव होणार
द गोलकोंडा ब्लू डायमंडला पहिल्यांदा लिलावात ठेवले जाणार आहे. 14 मे रोजी होणाऱया जिनेवातील क्रिस्टीच्या मॅग्नीफिसेंट ज्वेल्सच्या लिलावात या हिऱयाची बोली लागणार आहे. हा हिरा 23.24 कॅरेटचा हिरा निळ्या रंगाचा आहे. याची किंमत 430 कोटी आहे. या हिऱयाला सर्वात मौल्यवान आणि दुर्लभ निळ्या हिऱयांपैकी एक मानले जाते. या हिऱयाचा थेट संबंध हिंदुस्थानच्या राजघराण्याशी आहे. हा हिरा प्रसिद्ध गोलकोंडाच्या खदानीत सापडला होता. हा हिरा कधीकाळी इंदूरचे दुसरे महाराजा यशवंत राव होळकर यांच्याकडे होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List