ग्रामीण भागाने धार्मिकता जपण्याचे काम केले, बाजीराव दांगट यांचे प्रतिपादन

ग्रामीण भागाने धार्मिकता जपण्याचे काम केले, बाजीराव दांगट यांचे प्रतिपादन

ग्रामीण भागाने धार्मिकता जपली असल्याचे मत उद्योजक बाजीराव दांगट यांनी व्यक्त केले. जुन्नर तालुक्यातील उंब्रज नं. 2 येथे नुकताच हनुमान, शनैश्वर आणि पावशादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते.

हनुमान व शनैश्वर आणि पावशादेव प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 11 एप्रिलला मांडवडहाळे, कलश व मुर्ती मिरवणूक, गणेश पुजन, पुण्य वाचन, मातृका मंडल पुजा, नांदी श्राद्ध पुजन, आचार्य पुजन, मंडप पुजन, योगिनी पुजन, वास्तु मंडल पुजन, मुर्ती स्थापन विधी आणि भजन असे कार्यक्रम संपन्न झाले. तर 12 एप्रिल रोजी भजन, सवतो भद्र मंडल पुजन, नवग्रह मंडल पुजन, रुद्र मंडल पुजन, अग्रिपुजन, बली पुजन, पुर्ण अहुती, देहु येथील गाथा मंदिरचे केशव महाराज हगवणे यांच्या हस्ते मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. सायंकाळी ह.भ.प. रमेश महाराज थोरात यांची किर्तनरूपी सेवा संपन्न झाली. महालक्ष्मी प्रासादिक भजनी मंडळ उंब्रज नं.1 व 2, नाणेरबाबा भजन मंडळ, माऊली वारकरी संघटना, उंब्रज नं.1 व 2 आणि ग्रामस्थांची किर्तनाला साथ दिली.

या सोहळ्याला रंजना दांगट, जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट, मंदा दांगट, बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, मा. जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, ओतूरचे उपसरपंच प्रशांत डुंबरे, ह.भ.प. धोंडीभाऊ पानसरे, आधार पतसंस्थेचे अध्यक्ष भरत दांगट, जिल्हाधिकारी शिवाजीराव दावभट, शिवाजीराव निलख, तनुजा सदाकाळ, खंडुशेठ चौधरी, पैलास हांडे, गणेश हांडे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलास दांगट, व्हाईस चेअरमन जालिंदर शेवाळे, संजय हांडे उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ड्रग्जच्या नशेत त्याने माझा ड्रेस..; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, पुन्हा कधीच काम करणार नसल्याचा घेतला निर्णय ड्रग्जच्या नशेत त्याने माझा ड्रेस..; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, पुन्हा कधीच काम करणार नसल्याचा घेतला निर्णय
बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड.. इंडस्ट्री कोणतीही असली तरी ड्रग्जशी संबंधित बातम्या समोर येतच असतात. नुकतंच एका मल्याळम अभिनेत्रीने सेलिब्रिटींच्या ड्रग्ज...
PBKS vs KKR: मॅच जिंकवणाऱ्या युजवेंद्र चहलला प्रिती झिंटाने काय-काय दिलं?
“मला मागून स्पर्श..”; लोकल ट्रेनमध्ये अभिनेत्यासोबत घडला धक्कादायक प्रकार
‘या’ 5 पावडरचा त्वचेवर करा वापर, उन्हाळ्यातही फ्रेश आणि टवटवीत दिसाल
हादरवणारी घटना! रुग्णालयातील कर्मचारीच बनला हैवान, व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार अन्…
हॅरी पॉटर सीरिजसाठी 30 हजार ऑडिशन्स
430 कोटींच्या हिऱ्याचा लिलाव होणार