हिंदुस्थानी महिलेला नासातून काढले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाने हिंदुस्थानी वंशाच्या नासातील महिला अधिकारी नीला राजेंद्र यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. नीला राजेंद्र या अमेरिकेची अंतराळ संस्था नासामध्ये मोठय़ा पदावर कार्यरत होत्या. ट्रम्प यांनी डायव्हर्सिटी प्रोग्राम बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर नासाने हे पाऊल उचलले आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने (जेपीएल) ई-मेल पाठवून नीला यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती कर्मचाऱ्यांना दिली. नीला या डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुशनच्या अध्यक्षपदी होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List