अभिनेत्री नाही पाकिस्तानी गुप्तहेर होती ‘ती’? दाऊद इब्राहिमसोबत खास कनेक्शन
एका काळ असा होता जेव्हा बॉलिवूडवर अंडरवर्ल्डची दहशत होती. सिनेमांबद्दल अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय दाऊद याने मान्यता दिल्यानंतर घेतले जात होते. ज्यामुळे बॉलिवूडकरांना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. अंडरवर्ल्डची भीती प्रत्येकामध्ये होती. अंडरवर्ल्डची दहशत असल्यामुळे टी-सीरीजचे कर्ता – धर्ता गुलशन कुमार यांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. एवढंच नाही तर, अभिनेता हृतिक रोशन याचे वडील आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर देखील पैशांमुळे गोळीबार करण्यात आला.
असंही म्हटले जातं की 90 च्या दशकात अंडरवर्ल्डमधील लोक बॉलिवूड सिनेमांवर पैसे गुंतवायचे. एवढंच नाही तर त्यांचा दिग्दर्शक-निर्मात्यांवर सिनेमात त्यांच्या जवळच्या अभिनेत्रींना कास्ट करण्यासाठी दबाव असायचा. दाऊद इब्राहिमचं नाव तर असंख्य महिला सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं आहे. ममता कुलकर्णी, मंदाकिणी यांसारख्या अनेक अभिनेत्रींची नावे दाऊद इब्राहिम याच्यासोबत जोडण्यात आली.
दाऊद इब्राहिमच्या गर्लफ्रेंडच्या यादीत आणखी एका नाव आहे जिच्यासाठी दाऊद इब्राहिमने दिग्दर्शकाची गोळ्या झाडून हत्या केली. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे तिचं नाव अनीता आयूब असं आहे. दिवंगत अभिनेते देवानंद यांच्या सिनेमात अनीता आयूब मुख्य अभिनेत्री होती. जिचं कनेक्शन थेट पाकिस्तानशी होतं.
1995 मध्ये अनीता आयूब हिने देवानंद यांच्या ‘गँगस्टर’ सिनेमात मुख्य भूमिका बजावली. सिनेमा फ्लॉप ठरला आणि 2 वर्षांत अनीता आयूब हिचं बॉलिवूड करीयर नष्ट झालं. पण दाऊद इब्राहिमसोबत असलेल्या नात्यामुळे अनीता आयूब तुफान चर्चेत राहिली.
पाकिस्तानी अभिनेत्री अनीता आयूब हिने कधीच दाऊद सोबत असलेलं नातं स्वीकारलं नाही. पण रिपोर्टनुसार, अनीतामुळे एका बॉलिवूड निर्णात्याला स्वतःचे प्राण गमवावे लागले. ही घटना आहे 1995 मधील, जेव्हा निर्माते जावेद सिद्दीकी यांनी अनीता आयूब हिला सिनेमात कास्ट करण्यास नकार दिला.
अखेर जावेद सिद्दीकी यांची दाऊदने गोळ्या झाडून हत्या केली. रिपोर्ट्सनुसार, 90 च्या दशकात एका पाकिस्तानी मॅगझीनने एक लेख प्रसारित केला होता ती, बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक लोक अनिताला पाकिस्तानी गुप्तहेर मानत होते. या घटनेनंतर, अभिनेत्रीचं बॉलिवूडमधील करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं.
अनिता हिच्या करीयरबद्दल सांगायचं झालं तर, तिने 1987 मध्ये पारिस्तानी मालिका ‘गर्दिश’ मधून अभिनयास सुरुवात केली. त्यानंतर अनिता हसीना-ए-आलम, ईद फ्लाइट, दूसरा रास्ता यांसारख्या अनेक शोमध्ये दिसली. आता अभिनेत्री झगमगत्या विश्वापासून दूर न्यूयॉर्कमध्ये उद्योजक नवऱ्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List