‘आई राजा उदे उदे…’ च्या जयघोषात दुमदुमली श्री आई येडेश्वरी नगरी, लाखो भाविकांनी वेचली चुनखडी
येरमाळा येथील आई श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र यात्रेनिमित्त भक्तीचा महासागर उसळला होता. ‘आई राजा उदे उदे…’ चा जयघोष, नाचणारे वारु, ढोल ताशाच्या गजरात आज लाखो भाविकांनी येथील चुन्याच्या रानात चुनखडी वेचली. हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे.
आई श्री येडेश्वरी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून प्रसिद्ध आहे. हलगी, झांज, संबळाच्या गजरात रविवारी येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेत चुनखडी वेचण्याचा मानाचा कार्यक्रम विधीवत पार पडला. चैत्र पौर्णिमेनिमित्त भरलेल्या यात्रेत रखरखत्या उन्हातही जवळपास 15 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी येडाईच्या नगरीत हजेरी लावली. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे येडाई नगरी भक्तिसगरात न्हाऊन निघाली.
येडेश्वरी देवीचा यात्रा महोत्सव चैत्र पौर्णिमेच्या दरम्यान पार पडतो. ही यात्रा पाच दिवसाची असून यात्रा उत्सवातील चुना वेचण्याचा प्रमुख व मानाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. यानिमित्त शुक्रवारपासूनच येरमाळा येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातूनही देवीचे भक्त येरमाळा नगरीत दाखल होत होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List