उन्हामुळे पर्यटननगरी लोणावळ्यात शुकशुकाट

उन्हामुळे पर्यटननगरी लोणावळ्यात शुकशुकाट

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यातदेखील तापमानाचा पारा ३५ अंशांवर जाऊन पोहोचला असून, तापलेल्या सूर्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. याचा मोठा परिणाम पर्यटननगरी असलेल्या लोणावळ्यालादेखील बसला आहे.

लोणावळा आणि मावळ तालुक्यातील नेहमी गजबजलेली पर्यटन केंद्रे, लोहगड, विसापूर, राजमाची किल्ला, ढाक बहिरीकडे पर्यटकांनी पाठ फिरविल्याने स्थानिक हॉटेल्ससह इतर व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. गेल्या १५ दिवसांपासून राज्यात उन्हाने कहर केला आहे. मावळ तालुका आणि लोणावळा परिसरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. रविवारी (१३ रोजी) मावळ तालुक्यातील काही भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र, आज पुन्हा कडक ऊन पडले होते.

शनिवार, रविवार आणि सोमवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा सलग आलेल्या तीन सार्वजनिक सुट्ट्या आणि शाळांना लागलेल्या उन्हाळी सुट्ट्या यांमुळे मावळ तालुक्यात पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा होती. मात्र, उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे लोणावळा व पसिरातील पर्यटनस्थळांवर काही प्रमाणात शुकशुकाट दिसत होता. दरवर्षी शाळांना उन्हाळी सुट्टी लागली की, पर्यटक लोणावळा परिसर आणि मावळातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी येतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उन्हामुळे पर्यटकांची गर्दी कमी झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News