दिल्लीमध्ये ड्रोन डिलिव्हरी सेवा लवकरच
दिल्ली-एनसीआरमध्ये ड्रोन डिलिव्हरी सेवा लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत पार्सल घरपोच मिळणार आहे. स्काय एअर या कंपनीने गुरुग्राम आणि बंगळुरूच्या काही भागांत ड्रोन डिलिव्हरी सुरू केलेली आहे. कंपनीचे सीईओ अंकित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता दिल्ली, फरिदाबाद आणि पूर्ण एनसीआर क्षेत्रात सेवा सुरू होणार आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी मुंबई, पुणे, हैदराबाद, कोलकाता आणि अन्य काही शहरांत ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे. सध्या स्काय एअर कंपनी गुरुग्राम येथे 28 पिनकोडमधील 70 सोसायटी कव्हर करत आहे. येत्या काळात बंगळुरूमध्येही त्यांची सेवा विस्तारली जाणार आहे.
किती वजन उचलणार
स्काय एअर कंपनीचा ड्रोन सरासरी 4 किलो वजन घेऊन जाऊ शकतो. जास्तीत जास्त 10 किलो वजनाच्या वस्तू उचलू शकतो. दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तू, किराणा, औषधे, छोटे गॅजेट्स एकदम सहजतेने सुरक्षितरीत्या पोचवले जाऊ शकतात.
- स्काय एअर कंपनीची स्थापना 2020 साली झाली. कंपनीने ब्ल्यूडार्ट, शिपरॉकेट, डीटीडीसी अशा 12 लॉजिस्टिक कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. या वर्षाच्या अखेरीस एकूण 17-18 लॉजिस्टीक कंपन्यांसोबत भागीदारी होण्याची शक्यता आहे.
- कंपनीने 2024 मध्ये 12 लाख डिलिव्हरी केली. 2025 मध्ये 50 लाख डिलिव्हरीचे लक्ष्य ठेवले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List