पाकिस्तानच्या रेव्ह पार्टीत करीना कपूरचा असा डान्स, भडकले चाहते, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…

पाकिस्तानच्या रेव्ह पार्टीत करीना कपूरचा असा डान्स, भडकले चाहते, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…

Kareena Kapoor Khan AI Avatar: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. करीनाचा व्हायरल होणारा व्हिडीओ खरा नसून AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे की, करीना पाकिस्तान येथील कराची मधील एका रेव्ह पार्टीत डान्स करत आहे. व्हिडीओमध्ये करीना फॉर्मल कपड्यांमध्ये दिसत आहे. सध्या करीनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओची सुरुवात ‘कभी खुशी कभी गम’ सिनेमातील ‘पू’च्या अंदाजात होते. व्हिडीओवर लिहिण्यात आलं आहे की, ‘तुम्ही कराचीच्या रेव्ह पार्टीत आहात आणि करीना कपूर तुमच्या समोर डान्स करत आहे…’ व्हिडीओ पाहिल्यानंतर करीनाच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

भारतात देखील करीनाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी व्हिडीओ डिलिट करण्याची देखील मागणी केली आहे. करीनाच्या चाहत्यांनी कमेंटमध्ये प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘एनिमेशन प्रचंड वाईट आहे… असं का वाटत आहे, ती ऑफिसला जात आहे..’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hamza Haris (@mr.shotbox)

 

अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘सर्वात आधीतर व्हिडीओ डिलिट करा…’. तिसरा नेटकरी म्हणाला, ‘हा व्हिडीओ करीनाने राहिल्यानंतर ती देखील संताप व्यक्त करेल…’ अशा कमेंट नेटकरी करीनाच्या AI व्हिडीओवर करत आहेत. सध्या सर्वत्र करीनाच्या फेक व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

करीनाच्या हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच मेघना गुलझार यांच्या ‘दायरा’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात करीना दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे.

करीना फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच करीना आणि सैफ अली खान यांच्या घरात हल्लेखोराने खुसखोरी केली होती. दरम्यान, सैफ आणि हल्लेखोरात झालेल्या हाणामारीत सैफ गंभीर जखमी झाला होता. हल्ल्यानंतर करीना आणि सैफ यांनी मुलांसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ लागू केली आहे.

सोशल मीडियावर देखील करीना कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर करीनाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री करीना कपूर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उन्हाळ्यात ‘या’ तीन प्रकारचे चविष्ट कांजी प्या, आरोग्यासाठीही फायदेशीर उन्हाळ्यात ‘या’ तीन प्रकारचे चविष्ट कांजी प्या, आरोग्यासाठीही फायदेशीर
उन्हाळ्यात हेल्दी राहण्याकरिता जीवनशैलीबरोबरच योग्य आहाराची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील उष्णतेमुळे आपल्याला जास्त घाम येतो,...
एल्फिन्स्टन पुल बंद करण्यावरुन रणसंग्राम, स्थानिक आणि पोलीस आमने-सामने
कलाकारांच्या उपस्थिती मुंबईत रंगला ‘लाडकी बहीण चषक’; जिंकण्यासाठी संघांमध्ये चुरस
तुमच्या ‘या’ सवयीमुळे खराब होईल तुमचे लिव्ह, त्या आजच बदला
हैदराबादचा चेन्नईवर दणदणीत विजय, 18 वर्षात पहिल्यांदाच भेदला चेपॉकचा अभेद्य गड
Pahalgam Terror Attack – सुरक्षेत चूक, इन्टेलिजन्स फेल… पहलगाम हल्ल्यावर काँग्रेसची केंद्रावर प्रश्नांची सरबत्ती
पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय 3 टप्प्यात घेतला जाईल