मुंबईत खळबळ, चेंबूरमध्ये बिल्डर्सवर अज्ञातांकडून गोळीबार, गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल

मुंबईत खळबळ, चेंबूरमध्ये बिल्डर्सवर अज्ञातांकडून गोळीबार, गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल

चेंबूर येथील मैत्री पार्क येथे बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेत सदरुद्दीन खान यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक असलेल्या सदरुद्दीन खान यांच्याकार वर अज्ञातांनी जवळून गोळीबार केल्याची घटना चेंबुर येथील मैत्री पार्क येथे घडली आहे. या घटनेत सदरुद्दीन खान (५० ) यांच्यावर ४-५ गोळ्या अज्ञात इसमाकडून झाडण्यात आल्या आहेत. रात्री ९:३० च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली आहे.

दोघांनी बाईकवरुन येऊन गोळीबार

सायन – पनवेल महामार्गावरून  सदरुद्दीन खान नवीमुंबईला जात असताना डायमंड सिंगल येथे त्यांच्या गोळीबार झाला आहे. गोळीबार करणारे दोन हल्लेखोर  बाईकवरुन आले होते. त्यांनी जवळून गोळीबार करुन ते पसार झाले आहेत. आरोपींच्या शोधासाठी पाच पथके स्थापन करण्यात केली आहेत असे पोलीसांनी सांगितले आहे. गोळीबारानंतर एका लेनची वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्यामुळे येथे एरव्ही  देखील प्रचंड ट्रॅफीक असते. या घटनेने येथे घबराट पसरून आणखीन गोंधळ उडाला.  संपूर्ण सायन ते पनवेल महार्गावरील ट्रॅफीक त्यामुळे जाम झाले आहे. फोरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

सदरुद्दीन खान यांची प्रकृती स्थिर

चेंबूर येथील डायमंड गार्डन ते मैत्री पार्क परिवार या दरम्यान रस्त्यावर ही घटना घडली आहे. सदरुद्दीन खान यांच्यावर सध्या चेंबूर मधील झेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दोन   अज्ञात आरोपींनी मोटार सायकलीवरुन येऊन बांधकाम व्यावसायिकावर जवळून गोळीबार केला आहे. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. पोलीस उपायुक्त ढवळे येथे दाखल झाले असून स्थानिक परिसरात येथे सीसीटीव्हींचे जाळे असल्याने त्याचा आधार घेऊन आरोपींचा शोध सुरु झाला आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तनिषा भिसे मृत्यू प्रकरण, दीनानाथ रुग्णालय आणि डॉ. घैसास यांना क्लीन चिट? ससूनच्या अहवालात धक्कादायक माहिती तनिषा भिसे मृत्यू प्रकरण, दीनानाथ रुग्णालय आणि डॉ. घैसास यांना क्लीन चिट? ससूनच्या अहवालात धक्कादायक माहिती
गर्भवती तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यूप्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीने पुणे पोलिसांना चौकशी अहवाल सादर केला असून, त्यामध्ये डॉ. सुश्रुत घैसास...
संग्राम थोपटे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार, भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा
सोलापुरात शिवसैनिकांनी नितेश राणेंना कोंड्याचे चित्र दाखवले!
स्वारगेट बलात्कार प्रकरण, नराधम दत्तात्रय गाडेविरुद्ध 893 पानांचे दोषारोपपत्र दाखल
‘ईव्हीएम’बद्दल गप्प राहण्यासाठी वाल्मीक कराडने 10 लाख दिले, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा आरोप
‘लिव्हिंग विल’ कागदपत्रासाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, हायकोर्टाचे सरकारला आदेश
मालेगाव बॉम्बस्फोट खटला, न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्या बदलीला स्थगिती