सुप्रिया सुळेंचं रस्त्यासाठी उपोषण, अजितदादा नेमकं काय म्हणाले

सुप्रिया सुळेंचं रस्त्यासाठी उपोषण, अजितदादा नेमकं काय म्हणाले

पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या रस्त्यासाठी आज खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर उन्हात उपोषण केलं. काही वेळानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं, यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

पुण्यामधल्या रस्त्यासाठी उपोषणाला बसलेल्या सुप्रिया सुळे स्टंटबाजी करतात का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता नो कॉमेंट्स म्हणत अजित पवार यांनी यावर उत्तर देणं टाळलं. पण त्याच वेळेस हा रस्ता अवघा 600 मीटरचा आहे आणि रस्ता व्हावा ही इच्छाच असेल तर तो खासदार निधीतून करता येऊ शकतो असं म्हणत त्यांनी यावेळी अप्रत्यक्षरीत्या सुप्रिया सुळे यांना टोला देखील लगावला आहे. पिंपरीमध्ये विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कारासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दरम्यान गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात डॉ. घैसास यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे? या प्रकरणात काय कारवाई करणार असं विचारलं असता अजित पवार यांनी याबाबत चौकशी अहवाल आल्यानंतर त्याबाबत निर्णय होईल असं स्पष्टीकरण दिलं. कधीकधी आरोप झाल्यानंतरही राजीनामा द्यावा लागतो पण चौकशीनंतरच कारवाई होईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान बीडच्या आवादा कंपनीमध्ये चोरी झाल्याची तक्रार आली आहे, त्याबाबत चौकशी होऊन कारवाई केली जाईल, योग्य ती सुरक्षा देखील देणार असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.  पुणे मेट्रो पिंपरी चिंचवड शहराला वळसा मारुन चाकण पर्यंत घेऊन जाणार आहोत. रिंग रोडचं काम ही हातात घेतोय, ज्यांच्या जमिनी जातील, त्यांना टीडीआर देण्याचा हेतू आहे, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तनिषा भिसे मृत्यू प्रकरण, दीनानाथ रुग्णालय आणि डॉ. घैसास यांना क्लीन चिट? ससूनच्या अहवालात धक्कादायक माहिती तनिषा भिसे मृत्यू प्रकरण, दीनानाथ रुग्णालय आणि डॉ. घैसास यांना क्लीन चिट? ससूनच्या अहवालात धक्कादायक माहिती
गर्भवती तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यूप्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीने पुणे पोलिसांना चौकशी अहवाल सादर केला असून, त्यामध्ये डॉ. सुश्रुत घैसास...
संग्राम थोपटे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार, भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा
सोलापुरात शिवसैनिकांनी नितेश राणेंना कोंड्याचे चित्र दाखवले!
स्वारगेट बलात्कार प्रकरण, नराधम दत्तात्रय गाडेविरुद्ध 893 पानांचे दोषारोपपत्र दाखल
‘ईव्हीएम’बद्दल गप्प राहण्यासाठी वाल्मीक कराडने 10 लाख दिले, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा आरोप
‘लिव्हिंग विल’ कागदपत्रासाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, हायकोर्टाचे सरकारला आदेश
मालेगाव बॉम्बस्फोट खटला, न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्या बदलीला स्थगिती