फ्लॉप करीयरनंतर दहशतवाद्याशी लग्न, अशा अवस्थेत आढळला अभिनेत्री आणि आईचा मृतदेह, अत्यंत वाईट होता अंत
Bollywood Actress: 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वफा: ए डेडली लव स्टोरी’ सिनेमात दिवंगत अभिनेते राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होते. तर अभिनेत्री लैला खान हिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका बजावली होती. सिनेमा सुपर फ्लॉप ठरला, पण लैला हिच्या प्रसिद्धीत वाढ झाली. सिनेमातून लोकप्रियता मिळाल्यानंतर 2011 मध्ये अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर आली आणि सर्वांना मोठा धक्का बसला. कारण लैला हिच्यासोबत अभिनेत्रीची आई आणि कुटुंबातील अन्य सदस्यांचा मृतदेह देखील धक्कादायक आवस्थेत आढळून आला.
लैला हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, लैला खान हिचं खरं नाव रेशमा पटेल असं होतं. बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना अभिनेत्रीने दहशतवादी गटाचा सदस्य मुनीर खान याच्यासोबत लग्न केलं. दहशतवाद्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीचे वाईट दिवस सुरु झाले. 2011 मध्ये लैला आणि तिच्या कुटुंबातील काही सदस्य गायब असल्याची माहिती समोर आली आणि त्याचं सर्वांचा मृत्यू झाला अशी देखील चर्चा रंगली.
30 जानेवारी 2011 मध्ये लैला खान तिच्या कुटुंबासोबत इगतपुरी येथील हॉलिडे होममध्ये सुट्ट्यांना आनंद लुटण्यासाठी निघाली होती. अभिनेत्रीच्या कुटुंबात आई, भाऊ-बहीण आणि चुलत भाऊ देखील होते. काही दिवसांनी, 9 फेब्रुवारी रोजी, तिच्या आईने एका नातेवाईकाला फोनवर सांगितले की, ती तिचा तिसरा पती परवेझ इक्बाल टाक सोबत चंदीगडमध्ये आहे.
त्यानंतर लैला आणि तिच्या कुटुंबियांचा कोणासोबत संवाद झालाच नाही. अशात लैलाचे वडील नादिर शाह पटेल आणि निर्माता राकेश सावंत यांनी लैला गायब असल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली. रिपोर्टनुसार, 17 जुलै 2012 रोजी लैला खानचे वडील नादिर शाह पटेल यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. गुन्हे शाखेकडून पुरेशी प्रगती होत नसल्याचा दावा करून त्यांनी त्यांच्या मुलीच्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवण्याची विनंती न्यायालयाला केली.
लैलाचा नवराच नाही तर तिचे सावत्र वडील परवेझ इक्बाल टाक आणि आसिफ शेख यांचेही दहशतवादी गटांशी संबंध असल्याचा संशय अभिनेत्रीच्या वडिलांना होता. अखेर परवेझ टाक याला जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी 21 जून 2012 मध्ये अटक केली. दुसऱ्या प्रकरणाची चौकशी सुरु असताना परवेझ टाक याला अटक केली. तेव्हा टाक याने लैला आणि तिच्या कुटुंबियांची गोळ्या झाडून हत्या केल्याची कबुली दिली. पण नंतर त्याने आपले म्हणणे बदलले आणि ते अजूनही जिवंत असल्याचा दावा केला.
अखेर, परवेझ इक्बाल टाकने मुंबई गुन्हे शाखेला सांगितले की, त्याने वैयक्तिक कारणांमुळे लैला खानची आई शेलिनाला मारण्याची योजना आखली होती. त्याने कबूल केलं की त्याने लैला आणि तिच्या कुटुंबाची हत्या केली आणि त्यांचे मृतदेह इगतपुरी येथील त्याच्या बंगल्याच्या मागे पुरले.
आसिफ शेख, ज्याला नंतर बेंगळुरूमध्ये अटक करण्यात आली होती, त्यानेही टाकला हत्येत मदत केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान, पोलिसांना बंगल्याजवळ सहा मृतदेह पुरलेले आढळले. एवढंच नाही तर, नोव्हेंबर 2012 मध्ये, डीएनए चाचणी केल्यानंतर मृतदेह लैला आणि तिच्या कुटुंबियांचे असल्याचं समोर आलं. सावत्र वडिलांनी लैला आणि तिच्या कुटुंबियांची हत्या केल्याचा आरोप लावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार 30 जानेवारी 2011 मध्ये अभिनेत्रीचा मृत्यू झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List