आषाढी वारी पालखी सोहळा, संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे 19 जूनला पंढरीकडे प्रस्थान

आषाढी वारी पालखी सोहळा, संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे 19 जूनला पंढरीकडे प्रस्थान

चैत्री यात्रा संपली, आता आषाढी वारीचे वेध लागले आहेत. त्यानुसार आषाढी वारीसाठी श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे 19 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यातील वाढती वारकर्‍यांची संख्या लक्षात घेता पालखी तळ अपुरे पडत आहेत. नातेपुते, माळशिरस, वेळापूर येथील पालखी तळाची जागा बदलून द्यावी, अशी मागणी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी केली.

आषाढी वारीच्या नियोजनाची बैठक पंढरपूर येथे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व दिंडी समाजाची सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 7 रोजी पार पडली. या बैठकीस सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त अ‍ॅड. राजेंद्र उमप, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्त ज्ञानेश्वर जळगावकर, विठ्ठल महाराज वासकर, नाना महाराज वासकर, रामभाऊ चोपदार, दिंडी समाजाचे मारुती कोकाटे, राजाभाऊ थोरात, भाऊ फुरसुंगीकर यांच्यासह दिंडी समाजाचे प्रमुख पदाधिकारी, दिंडी प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी शेडगे दिंडी क्रमांक 3 चे प्रमुख जयसिंग महाराज मोरे यांच्यासह वर्षभरात निधन पावलेल्या दिंडीकर्‍यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

या बैठकीत योगी निरंजनाथ म्हणाले की, यंदाच्या पालखी सोहळ्यात फारशा अडचणी नाहीत. परंतु हडपसरपासून पालखी मार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. ते काम पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. दिवेघाटात रस्ता रुंदीकरण सुरू आहे, तेथे पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता आहे. तेथे लोखंडी जाळी मारावी. फलटण ते धर्मपुरी अपूर्ण रस्ताही लवकर पूर्ण करावा. नातेपुते, माळशिरस व वेळापूर येथील पालखी तळ अपुरे पडत आहेत. नातेपुते येथे गावाबाहेर पालखी तळाला जागा द्यावी, माळशिरस येथे कृषी कार्यालयाजवळील जागा मिळावी. तर वेळापूर येथील पालखी तळ हा महामार्गाच्या कामात गेला आहे. तेथे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. या तळाची जागा बदलून शेती महामंडळाची जागा पालखी तळासाठी द्यावी, अशी मागणी योगी निरंजनाथ यांनी केली.

या बैठकीत दिंडी समाजाने पाणी, फिरती शौचालये याविषयी प्रश्न उपस्थित केले. यंदा प्रस्थान दिवशी गुरुवार आल्याने माउलींच्या पालखी सोहळ्याचे 19 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रस्थान होणार आहे. यंदा तिथीचा क्षय झाल्याने पालखी सोहळ्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे पालखी सोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखणे यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हा बॉलिवूड अभिनेता 15 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या माधुरीच्या प्रेमात वेडा होता; तिचे लग्न झालं तेव्हा ढसाढसा रडला हा बॉलिवूड अभिनेता 15 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या माधुरीच्या प्रेमात वेडा होता; तिचे लग्न झालं तेव्हा ढसाढसा रडला
बॉलिवूडमधील ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षित ही लाखो दिलों की धडकन आहे. तिचे चाहते हे कित्येक कलाकारही आहेत. आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील...
ना हिंदू, ना शीख… गोविंदाची बायको सुनीता मानते या धर्माला, दारूसाठी धर्मच बदलला
महेश मांजरेकरांना जीवनगौरव,तर मुक्ता बर्वे ते अनुपम खेर यांना विशेष पुरस्कार जाहीर; आशिष शेलारांची घोषणा
मी मेल्यावर मला कोणीही खांदा देणार नाही… या सुपरस्टारचे शब्द खरे ठरले, मुलगी वडिलांचा चेहराही पाहू शकली नाही
‘ही’ काळी गोष्ट पाण्यात भिजवून खा, वर्षानुवर्षे राहाल तरुण
ED, CBIच्या कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही, रमेश चेन्नीथला यांनी भाजपला ठणकावलं
पुणे-सातारा महामार्गावर वोल्वो बसला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या खिडकीतून उड्या