ऑक्सफर्डमधून शिक्षण घेतलेली अभिनेत्री अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात; करिकर गेलं, तुरुंगात जाव लागलं, आयुष्य उद्धवस्त झालं

ऑक्सफर्डमधून शिक्षण घेतलेली अभिनेत्री अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात; करिकर गेलं, तुरुंगात जाव लागलं, आयुष्य उद्धवस्त झालं

बॉलिवूडध्ये होणारे अफेअर आणि घटस्फोट ही एक सामान्य बाब राहिली आहे. पण काही बॉलिवूड अभिनेत्रींचे नाव थेट त्या काळच्या अंडरवर्ल्ड डॉनसोबत जोडले गेले होते. त्यांच्या प्रेमकहाण्या आजही सांगितल्या जातात किंवा चर्चेत असतात. पण अंडरवर्ल्ड डॉनसोबत ज्या ज्या अभिनेत्रींचे नाव जोडले गेले त्यांना ही इंडस्ट्री सोडूनच जाव लागल्याचं दिसून आलं होतं.

अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात पडण्याची चूक अभिनेत्रीला चांगलीच महागात

अशीच एक अभिनेत्री आहे जिने अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे आणि अनेक सीरियल्स भाग राहिली आहे. तिने परदेशातून शिक्षण घेतलं. तसेच सर्वजण तिच्या सौंदर्यावरही तेवढेच भाळायचे. पण एका चुकीच्या निर्णयामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. एका अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात पडण्याची चूक अभिनेत्रीला चांगलीच महागात पडली. यामुळे तिचं करिअर उद्ध्वस्त झालं.

ही सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे मोनिका बेदी. तिचे नाव एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमशी जोडले गेले. तिला अबू सालेमची गर्लफ्रेंड म्हणून तिला ओळखले जाऊ लागले. एवढंच नाही तर अभिनेत्रीला अनेक वर्षे तुरुंगात घालवावी लागली होती. एवढंच नाही तर तिचे नाव एका एमएमएस स्कँडलमध्ये जोडल्यानंतर तिच्या नावाची जास्तच बदनामी होऊ लागली. व्हायरल झालेली क्लिप ही तिचीच असल्याचं म्हटलं जातं पण अभिनेत्रीने ते कधीच मान्य केलं नाही.

मोनिका बेदीचा जन्म आणि शिक्षण

मोनिका बेदीचा जन्म 18 जानेवारी 1975 रोजी झाला. तिचा जन्म पंजाबमधील होशियारपूर येथे झाला असला तरी, तिचे पालक ती लहान असतानाच नॉर्वेला गेले. मोनिकाने स्वतः ऑक्सफर्डमधून शिक्षण घेतले आणि नंतर दिल्ली विद्यापीठातूनही शिक्षण घेतले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Monica Bedi (@memonicabedi)


मोनिका बेदीची कारकीर्द

मोनिका बेदीने तिच्या करिअरची सुरुवात तेलुगू चित्रपट ताजमहलमधून केली. यानंतर ती हिंदी चित्रपटांमध्ये दिसली. तिच्या कारकिर्दीत तिने सुनील शेट्टी, सलमान खान, संजय दत्त, गोविंदा आणि धर्मेंद्र यांसारख्या मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ती बिग बॉस 2 आणि झलक दिखला जा 3 मध्येही दिसली होती. 2014 मध्ये ती रोमियो रांझामध्ये दिसली होती आणि त्यानंतर तिला कोणताही मोठा प्रोजेक्ट मिळाला नाही.

भूतकाळामुळे काम मिळाले नाही

दरम्यान एका मुलाखतीत तिने स्वतः सांगितले होते की, तिच्या भूतकाळामुळे ती तिच्या कारकिर्दीत पुनरागमन करू शकली नाही. आजही लोक तिच्यासोबत काम करण्यास कचरतात. तिच्या भूतकाळामुळे, कोणीही तिला साधं घरही देत नाही आणि कोणीही तिच्याशी कसलेच संबंधही ठेवत नाही. त्यामुळे अनेकदा तिला समस्यांना तोंड द्यावं लागतं. मोनिकाची अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमशी जवळीक वाढल्याच्या चर्चा या बॉलिवूडमध्ये पसरल्या होत्या. तेव्हा अभिनेत्रीने पहिल्यांदाच डॉनला एका स्टेज शोमध्ये पाहिलं आणि ती त्याच्या प्रेमात पडली. यानंतर दोघेही जवळ आले.

अंडरवर्ल्ड डॉनसोबत मोनिका बेदीची प्रेमकहाणी

एका मुलाखतीत, मोनिका बेदीने अबू सालेमसोबतच्या तिच्या प्रेमकथेवरही प्रतिक्रिया दिली. मग ती म्हणाली, ‘जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्हाला काहीही दिसत नाही.’ तिने हे देखील कबूल केले की लोक तिला गोल्ड डिगर मानत समजत असतं. ती म्हणाली, “अबूकडे पैसे होते.’ म्हणून लोकांना वाटले की तो मला राणीसारखा ठेवतो. पण मी खूप संघर्ष आणि वेदना पाहिल्या आहेत. आम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचो. मी त्याच्यासाठी स्वयंपाकापासून ते साफसफाईपर्यंत सर्व काही करायचे. म्हणूनच मी स्वयंपाकही शिकले. लोक म्हणायचे की मी पैशामुळे त्याच्यासोबत आहे. पण पैसे कुठे होते? हळूहळू तो खूप आक्रमक आणि चिडचिडा होऊ लागला. मी कोणत्या अडचणीत सापडलेय याचा मला नेहमीच प्रश्न पडायचा”

मोनिका बेदी प्रकरण

मोनिका बेदी म्हणाली होती की तिला अबू सालेम कोण आहे याची काहीच कल्पना नव्हती. तोपर्यंत तिने फक्त दोनच नावे ऐकली होती, दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील. पण तिला अबू सालेमबद्दल काहीच माहिती नव्हती. अभिनेत्रीने दावा केला होता की त्याने आपली ओळख अर्शलान अली म्हणून सांगितली होती. बरं, या प्रेमसंबंधामुळे मोनिका बेदीला खूप काही पणाला लावावे लागलं. 2006 मध्ये, तिला अबू सालेमसह बेकायदेशीर कागदपत्रे बनावट केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. तिला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आली. यामुळे तिचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. 2010 मध्ये तिला या प्रकरणातून सोडण्यात आलं. 2013 मध्ये तिने सरस्वती चंद्र या चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेतून पुन्हा एकदा कमबॅक केलं.

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत यंदा जोरदार पाऊस बसरणार, सामान्यापेक्षा जास्त पावसाचा अंदाज मुंबईत यंदा जोरदार पाऊस बसरणार, सामान्यापेक्षा जास्त पावसाचा अंदाज
Mumbai Weather : मुंबईकरांसाठी यंदा मान्सूनची चांगली बातमी आहे. मुंबई आणि उपनगरात चांगल्या पावसाचे संकेत आहे. मुंबईत सामान्यपेक्षा जास्त पावसाचा...
नराधम मौलवी चार वर्षे गाडलेल्या शिरावर बसला, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
कर्जतच्या रेल्वे ट्रॅकवर महिलेची ‘सुटकेस बॉडी’; हत्या करून बॅगेत कोंबले, शीना बोरा, पेणपाठोपाठ तिसरी घटना..
पाण्यासाठी घोडबंदरमधील आदिवासींचा हंडा मोर्चा, पाणीटंचाईच्या झळा…
उरणच्या अदानी व्हेंचर्स कंपनीत स्फोट; धुतूम गाव हादरले, ग्रामस्थ सैरावैरा पळाले.. अभियंता गंभीर जखमी
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 17 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
गर्भवती मृत्यू प्रकरण, ससूनच्या समितीचा अहवाल सादर; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर काय कारवाई होणार याकडे लक्ष