दोन कोटी रुपयांचा अपहार करणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला अटक

अंधेरी येथील एका खासगी बँकेच्या 2 कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी एकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सागर मिश्रा असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंधेरी येथे एक खासगी बँक आहे. त्या बँकेत तक्रारदार हे वरिष्ठ पदावर काम करतात. त्यांच्या बँकेतील काही कर्मचारी हे पदाचा गैरवापर करून कोटय़वधी रुपयांचा अपहार करत असल्याची माहिती त्यांना समजली. त्यानंतर त्याबाबत त्यांनी वरिष्ठांना माहिती सांगितली. बँकेने चौकशीचे आदेश दिले. चौकशीदरम्यान सहा कर्मचाऱयांना बँकेने काही विशेष अधिकार दिले होते. त्या अधिकारांचा त्यांनी गैरवापर केला.

बँकेचे दोन कोटी 5 लाख रुपये हे नातेवाईकाच्या बँक खात्यात वर्ग केले होते. हा घोटाळा उघड होऊ नये याची खबरदारी घेतली होती. अपहाराचा प्रकार लक्षात येताच बँकेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. सागर हा अंधेरी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून सागरला अटक केली. पाच जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ऐश्वर्या राय हिच्या गाडीला अपघात, व्हिडिओ व्हायरल, युजर्स म्हणाले… ऐश्वर्या राय हिच्या गाडीला अपघात, व्हिडिओ व्हायरल, युजर्स म्हणाले…
Aishwarya Rai Bachchan Car Accident: बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या हिच्या कारला बेस्ट बसचा धक्का लागला. बुधवारी दुपारी ऐश्वर्याच्या जुहू येथील निवासस्थानाजवळ...
एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये मोठा बदल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला प्लॅन
Breaking News : दिशा सालियनचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर, धक्कादायक माहिती उघड
उन्हाळ्यातही टाचांना भेगा पडतात, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा आराम
उन्हाळ्यात त्वचेच्या काळजीसाठी आले कसे फायदेशीर आहे? दररोज किती खावे? जाणून घ्या
धावत्या एक्सप्रेसमध्ये महिलेचा विनयभंग, TTE विरोधात गुन्हा दाखल
मोदी सरकारच्या काळात अल्पसंख्याकांवरील हिंसाचारात वाढ; अमेरिकेचा अहवाल