दीपिका पदूकोण बनली शाहरूख खानच्या लेकीची आई; यामागचं कारण फारच खास
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या खासगी आयुष्यासाठीही तेवढाच चर्चेत असतो. शाहरूख खानचं त्याच्या कुटुंबावर किती प्रेम आहे विशेषत: त्याच्या मुलांच्याबाबतीत तो बाप म्हणून किती हळवा आहे, याबद्दल सर्वांनाच माहित आहे. गौरी खानही तिच्या घराची आणि मुलांची एक उत्तम आई आहे. पण तुम्हाला माहितीये का दीपिका पदूकोण शाहरूख खानच्या लेकीची आई बनली आहे. होय, दीपिका पादूकोण शाहरूखची लेक सुहाना खानची आई बनली आहे. पण यामागे एक इंट्रेस्टींग कारण आहे.
शाहरूखचा दीपिका पदुकोणसोबत रोमान्स
शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित ‘किंग’ चित्रपटाबद्दल दररोज नवीन अपडेट्स येत आहेत. या चित्रपटाद्वारे, शाहरूखची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमध्ये करणार आहे. मात्र आता अशी बातमी आहे की अभिनेत्री दीपिका पदुकोणनही या चित्रपटाचा एक महत्त्वाचा असणार आहे. दीपिका चित्रपटात एका अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. एका रिपोर्टनुसार आता पुन्हा एकदा शाहरुख खान ‘किंग’मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
दीपिका पदुकोण बनली सुहाना खानची आई
मुख्य म्हणजे दीपिका पदुकोण या चित्रपटात शाहरूखची लाडकी लेक सुहाना खानच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. ती सुहानाच्या आईची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण त्याशिवायही दीपिकाची अशी एक स्वतंत्र भूमिकाही फार महत्त्वाची असणार आहे. दीपिका पदुकोणनेही या भूमिकेसाठी होकार दिल्याची माहिती आहे. याआधी शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणची जोडी ‘पठाण’ आणि ‘जवान’ , चेन्नई एक्सप्रेस, ओम शांती ओम, हॅपी न्यू इअर या चित्रपटांमध्ये दिसली होती. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरले. जर दीपिका ‘किंग’ मध्ये दिसली तर हा तिचा शाहरुखसोबतचा सहावा चित्रपट असेल.
कथा ‘बिच्छू’ या अॅक्शन थ्रिलर चित्रपटापासून प्रेरित असल्याचं म्हटलं जातं.
शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटाबद्दल बोलायचं झाले तर, त्याची कथा ‘बिच्छू’ या अॅक्शन थ्रिलर चित्रपटापासून प्रेरित असल्याचं म्हटलं जातं. ज्यामध्ये शाहरुख आणि सुहाना आपला बदला घेताना दिसणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरणाची जोरदार तयारी देखील आहे. हा चित्रपट पुढील वर्षाच्या अखेरीस म्हणजेच 2026 मध्ये प्रदर्शित होईल. याआधी शाहरुख खान ‘डंकी’ चित्रपटात दिसला होता. ज्यामध्ये तो तापसी पन्नू आणि विकी कौशलसोबत दिसला होता . दीपिकाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री शेवटची प्रभाससोबत ‘कल्की’ चित्रपटात दिसली होती. ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि कमल हसन सारखे दिग्गज स्टार देखील होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List