उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या ताफ्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली, पालकांमध्ये संताप
विशाखापट्टणममध्ये उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या ताफ्यामुळे 30 विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. पण दुसरीकडे पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की इंजिनीअरिंगचे 30 विद्यार्थी जेईईच्या प्रवेश परीक्षेसाठी जात होते. सकाळी सात वाजता या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर हजर राहणे अपेक्षित होते. पण त्याचवेळी उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा ताफा जात होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांना वाहतूक पोलिसांनी रोखून ठेवलं. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशीर झाला. उशीर झाल्यामुळे पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून रोखलं.
दुसरीकडे पोलिसांनी विद्यार्थ्यांचा हा आरोप फेटाळून लावला आहे. विद्यार्थ्यांची परीक्षेची वेळ ही सात वाजताची होती. पण उपमुख्यमंत्र्यांचा ताफा हा 8.41 वाजता गेला. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडवण्याचा प्रश्नच येत नाही असे पोलिसांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List