जिथे भगवा फडकेल असा कोकणातला एकही कोपरा सोडायचा नाही, उद्धव ठाकरेंनी भरला हुंकार

जिथे भगवा फडकेल असा कोकणातला एकही कोपरा सोडायचा नाही, उद्धव ठाकरेंनी भरला हुंकार

दिलेल्या शब्दाला जागणारा एकच पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच जिथे भगवा फडकेल असा कोकणातला एकही कोपरा सोडयचा नाही असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये हुंकार भरला.

आज सहदेव बेटकर यांनी मातोश्रीत शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश घेतला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, सहदेवराव एवढ्या जोरात बोलले हा आवाज तळ कोकणापर्यंत गेला असेल. दत्ता तुमचा आज वाढदिवस आहे तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना. तुमचं खरंच कौतुक आहे. स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही इथे आलात, ही वाढ महत्त्वाची आहे. आपले शिवसेनाप्रमुख सांगायचे की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय. दत्तांसारखे अनेक शिवसैनिक आहे जे राज्यभर पसरले आहेत. त्यांनी आतापर्यंत शिवसेना वाढवली. या पुढे सुद्धा पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत.

तसेच लोकसभा काय किंवा विधानसभा काय हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता. कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टी आता सुरस कथा बाहेर यायला लागल्या आहेत. सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणारा एकच पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना आणि शिवसेना एकच आहे. दुसऱ्या काय शेंडा नाही बुडखा नाही. स्वतःच्या लाभापाई लोभापाई ही गेलेली माणसं आहेत. गेलात मोठे झालात ठीक आहे पण तुम्हाला ज्यानी मोठं केलं ती सगळी साधी माणसं माझ्या सोबत आहेत. त्याच्यामुळे मला चिंता नाही. येत्या 16 तारखेला मी नाशिकला एकदिवसाच्या शिबिरासाठी जातोय. माझा सलग दौरा अगदी तळ कोकणापासून वरपर्यंत आम्ही करणार आहोत. तुम्ही सांगाल तिथे मी येणार आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच काही स्थानिक पातळीवरती थोड्या कुरकुरी झाल्या तरी आपलं घर कधी सोडायचं नाही. आता परत घरी आलेला आहात आपल्या घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेला सगळे प्रामाणिक राहिलात. जे जात आहेत त्यांच्या लेखी आपल्याकडे काही नसेल पण माझ्यासाठी तुम्ही सगळेजण आहात हेच केवढंतरी माझं मोठं वैभव आहे. तुम्हाला सगळ्यांना जसं मी आपल्या जिल्हाप्रमुखांना शुभेच्छा दिल्या तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी शिवचरणी प्रार्थना करतो. असेच सगळे येत रहा, मी पण तुमच्याकडे येईन आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपर्यंत खालपासून वरपर्यंत एकही कोपरा असा सोडायचा नाही की जिकडे भगवा फडकलेला असेल असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत यंदा जोरदार पाऊस बसरणार, सामान्यापेक्षा जास्त पावसाचा अंदाज मुंबईत यंदा जोरदार पाऊस बसरणार, सामान्यापेक्षा जास्त पावसाचा अंदाज
Mumbai Weather : मुंबईकरांसाठी यंदा मान्सूनची चांगली बातमी आहे. मुंबई आणि उपनगरात चांगल्या पावसाचे संकेत आहे. मुंबईत सामान्यपेक्षा जास्त पावसाचा...
नराधम मौलवी चार वर्षे गाडलेल्या शिरावर बसला, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
कर्जतच्या रेल्वे ट्रॅकवर महिलेची ‘सुटकेस बॉडी’; हत्या करून बॅगेत कोंबले, शीना बोरा, पेणपाठोपाठ तिसरी घटना..
पाण्यासाठी घोडबंदरमधील आदिवासींचा हंडा मोर्चा, पाणीटंचाईच्या झळा…
उरणच्या अदानी व्हेंचर्स कंपनीत स्फोट; धुतूम गाव हादरले, ग्रामस्थ सैरावैरा पळाले.. अभियंता गंभीर जखमी
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 17 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
गर्भवती मृत्यू प्रकरण, ससूनच्या समितीचा अहवाल सादर; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर काय कारवाई होणार याकडे लक्ष